CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मामाने आई-वडिलांसमोरच केली भाच्याची हत्या, डोंबिवली हादरली!

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM

No image available

डोंबिवली : दिवाळी सणानिमित्त निमित्त संपूर्ण देशात उत्साह व आनंदाचे वातावरण असताना या आनंदावर विरजण टाकणारी दुर्दैवी घटना डोंबिवली मध्ये घडली आहे. डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा विनायक कुंडल सोसायटी मध्ये घरगुती वादातून मामाने सख्ख्या भाच्याची चाकूने भोसकून खून केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मानपाडा पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती आहे.

आमच्या क्राईम बॉर्डर वार्ताहराकडून मिळालेल्या माहितीनुसार यश संजय तिवारी असं खून झालेल्या भाच्याचं नाव असून सतीश राजनारायण दुबे असं आरोपी मामाचं नाव आहे. आरोपी सतीश हा बहिण सरिता तिवारी यांच्या घरीच राहायला होता. सरिता यांच्या घरात त्यांचा पती, मुलगा यश व सरिताचे वडील आणि आरोपी सतीश असे एकत्र रहात होते.दि. २३ ऑक्टोबर २०२२ ला किरकोळ घरगुती वादातून सतीशने वडील आणि सरिताचा पती संजय यांच्याशी वाद सुरु केला. तुमच्यामुळेच माझी बायको वेगळी राहते या कारणावरून शिवीगाळ करुन तो दोघांना मारहाण करायला धावत होता. ते पाहून भांडण सोडविण्यासाठी भाचा यश याने हस्तक्षेप केला व तो मामला म्हणाला कि , मामा तू आमच्याच घरात राहतो आणि आम्हालाच शिव्या देतो त्याचा राग सतीशला आल्याने त्याने रागाच्या भरात स्वयंपाक घरातील धारदार चाकूने सर्वांसमोरच यशवर सपासप वार केले व तेथून पळ काढला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यशचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून मानपाडा पोलीसांनी या संदर्भात गुन्हा नोंद करून आरोपी मामाला बेड्या ठोकत गजाआड केले असून पुढील तपास पो.नि. मदने करीत आहे.