CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

टू व्हीलर चोरणारा गजाआड , विष्णुनगर पोलीसांची उत्तम कामगिरी

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM

No image available

डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी त्यांच्या घराबाहेर लावलेल्या मोटरसायकली तसेच रेल्वे स्टेशन परिसर व अन्य ठिकाणी नागरिक त्यांच्या टू व्हीलर गाड्या पार्क करून त्यांच्या कामावर जात असल्याचे पाहून परिसरामध्ये टू व्हीलर व लहान मुलांच्या सायकली चोरण्याचे प्रमाण वाढले होते .यामुळे नागरिंकात भीतीचे वातावरण पसरल्याने वरिष्ठांनी आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीसांना असे गुन्हे करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते.

uत्या अनुषंगाने विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ डिटेक्शन ब्रांच चे फौजदार कुलदीप मोरे व पोलीस शिपाई कुंदन भामरे* यांना बोलवून परिसरात टू व्हीलर मोटरसायकली व लहान मुलांच्या सायकली चोरून उच्छाद मांडणाऱ्या आरोपींना तात्काळ शोधून काढण्याचे आदेश दिले .त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ डिटेक्शन ब्रांचचे फौजदार कुलदीप मोरे व पोलीस शिपाई कुंदन भामरे यांनी त्यांच्या खबऱ्यांना कामाला लावले व ते स्वतः या परिसरात अशा चोरांचा शोध घेऊ लागले परंतु हे भुरटे चोर सापडत नव्हते परंतु त्यांनी त्यांचा तपास सुरूच ठेवला.

तपास सुरू असतांना पोलीस शिपाई कुंदन भामरे यांना त्यांच्या खबऱ्याने माहिती दिली की साहेब टू व्हीलर गाड्या मास्टर की ने सुरु करून चोरुन घेऊन जाणारी टोळी कार्यरत असून त्यांच्यातील एक सदस्य हा डोंबिवली वेस्ट परिसरातील गाड्या चोरून घेऊन जातो व कमी किमतीत विकून टाकतो अशी माहिती दिली.अशाप्रकारे गाड्या चोरून विकणारा इसम हा डोंबिवली पूर्वेकडील ९० फीट परिसरात तुम्हाला सापडू शकेल कारण त्या ठिकाणी ही सर्व टोळी आपापसात संगणमत करून गाड्या चोरत असतात.अशा प्रकारचा तपास सुरू असतानाच डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधू जयकुमार पिल्ले वय वर्ष ४३ यांनी दि. २ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्यांची हिरो कंपनीची टू व्हीलर गाडी महात्मा फुले रोड रिक्षा स्टँड डोंबिवली पश्चिम या ठिकाणी पार्क केली व ते त्यांच्या कामासाठी निघून गेल्या.त्यांचे काम करून त्या परत आल्या असता त्यांना त्यांची हिरो कंपनीची मोटरसायकल तिथे दिसून आली नाही. त्यांनी खूप शोध घेतला परंतु मिळून न आल्याने त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गाडी चोरून नेल्याची तक्रार नोंदविली त्यानुसार गु.रजि.नं. २८७/२० ,भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

piदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास सुरू झाला *तपासा दरम्यान पोलीस शिपाई कुंदन भामरे यांना त्यांच्या गुप्त खबऱ्याने खबर दिली की, साहेब सदर गुन्ह्यांतील मोटरसायकल सोडणारा *संशयित आरोपी हा ९० फुटी रोड डोंबिवली पूर्व या ठिकाणी उभा आहे.* तात्काळ माहिती मिळतात पोलीस शिपाई कुंदन भामरे यांनी डिटेक्शन ब्रांचचे फौजदार कुलदीप मोरे यांना सदर माहिती सांगितली असता ते तात्काळ 90 फुटी रस्त्यावर साध्या वेशात गेले, असता त्यांना एका आडबाजूला एक संशयित इसम मोटरसायकल घेऊन उभा असतांना दिसला .तात्काळ त्याला क्षणाची उसंत न देता ताब्यात घेतले व त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद इसाक युनूस खान वय वर्ष ५४ व्यवसाय टेलर काम ,राहणार रूम नंबर ३, स्नेहा अपार्टमेंट आजदे पाडा , शंकर मंदिराजवळ डोंबिवली पूर्व असे सांगितले .त्याच्याकडे चोरीस गेलेल्या मोटरसायकली बाबत चौकशी केली असता तो ताकास तुर लागू देत नव्हता परंतु त्याला खास पोलीस खाक्या दाखविला असता त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. त्याला रितसर अटक करून कोर्टात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली कोठडी दरम्यान त्याने टू व्हीलर गाड्या कशा प्रकारे चोरल्या जातात व कधी चोरल्या जातात त्याचे काय होते या संदर्भात माहिती दिली.

psipcया गुन्ह्यात टू व्हीलर गाड्या चोरणारे मास्टर की चा वापर करून त्या मोटरसायकली चोरुन डोंबिवलीमध्येच विकत असतात अशी कबुली दिली आणि अल्प किमतीत मोटरसायकल मिळत असल्याने नागरिकही त्या घेतात असे निदर्शनास आले.अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मुद्देमाल जमा करण्यात आला असून सदर इसमाने ठाणे शहर आयुक्तालय परिमंडळ -३ , कल्याण मधील विष्णुनगर पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन ,टिळक नगर पोलीस स्टेशन , मानपाडा पोलीस स्टेशन अशा हद्दीत चोऱ्या केल्याचे कबूल केले असून सदर इसमाने विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३ , रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ५ , टिळक नगर पोलीस ठाणे डोंबिवली पूर्व हद्दी तून १, तर मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली पूर्व च्या हद्दीतून २ गाड्या सोडण्याचे कबुली दिली आहे

yसदर गुन्ह्यांसंदर्भात अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण तसेच डीसीपी सचिन गुंजाळ परिमंडळ ३, कल्याण एसीपी सुनील कुराडे डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील फौजदार कुलदीप मोरे व पोलीस शिपाई कुंदन भामरे यांच्यासह पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाईकरे ,सावंत ,पोलीस हवालदार जमादार, पाटणकर ,सांगळे ,घोलप तसेच पोलीस नाईक तडवी ,तुळशीराम लोखंडे, सचिन कांगुणे ,विक्रम गवळी, पोलीस शिपाई शशिकांत ,चालक पोलीस शिपाई कमोदकर ,वानखेडे यांनी परिश्रम घेतले.

- राजेंद्र वखरे