CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

OLA Driver Murder Divaडोक्यात दगड घालून ओला चालकाचा निर्घृण खून हत्या, ४ आरोपीं जेरबंद

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM

No image available

CRIME BORDER NEWS NETWORK

४ आरोपींनी ओला चालकाला निर्मनुष्य ठिकाणी नेले आणि डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून ( OLA Driver Murder Diva thane ) केकला. आरोपी हे नशेत होते, त्यांना आणखी नशा करण्यासाठी पैसे हवे होते. त्यांनी ओला चालकाकडून ( OLA Driver Murder news ) जबरदस्तीने पैसे घेतले. त्याने प्रतिकार केला असता आरोपींनी चालकाचा खून केल्याची माहिती पोलीसांनी दिली.

डोंबिवली : - ४ आरोपींनी ओला चालकाची हत्या केल्याची घटना नुकतीच दिव्यात घडली आहे. आरोपींनी ओला चालकाला निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवायला लावली आणि तेथे डोक्यात दगड घालून त्याची ( OLA Driver Murder thane ) हत्या केली. आरोपी हे नशेडी होते, त्यांना नशा करण्यासाठी पैसे हवे होते. अटक चारही आरोपी हे नशेडी असून ते गांजा या अमली पदार्थाच्या आहारी गेलेले असल्याची माहिती पोलीसांनी दिली. आरोपींनी गाडी खर्डी रोड जवळ लघुशंका करण्यासाठी थांबवली. नशा करण्यासाठी आरोपींना पैसे हवे होते म्हणून त्यांनी ओला चालकालाच मारहाण करण्यास सुरुवात केली. ओला चालकाच्या खिशातून आरोपींनी अडीच हजार रुपये आणि एक मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. ओला चालकाने प्रतिकार केला असता आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड आणि पेव्हर ब्लॉकने जोरदार प्रहार करून त्याचा खून केला .

४ ही आरोपींना अवघ्या १० तासांत शीळ डायघर पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती एसीपी व्यंकट आंधळे यांनी दिली. आरोपींना अटक करून न्यायालयात नेले असता त्यांना ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अटक आरोपींमध्ये हसिरूल हालीम शेख (वय ३६ रा. मुंब्रादेवी कॉलोनी, दिवा पूर्व) आतिश भोसले (वय २१ रा. तुळशीपाडा पाईपलाईन, भांडुप) ओंकार कासेकर (वय २१ रा. कळवा रेल्वे लाईन झोपडपट्टी कळवा) आणि प्रशांत पेरिय (वय १९ रा. दातिवली गाव, दिवा ठाणे) यांचा समावेश आहे. तर यांच्यासह एक अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे.

ठाण्यातील शिळ डायघर पोलिसांना २९ मे रोजी दिवा गावातील एका शेतकऱ्याने एका अज्ञात व्यक्तीचा खून झाला असून त्याचे शव खर्डी रोडकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरील ब्रिज खाली अर्धनग्न परिस्थितीत पडला असल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच शिळ डायघर पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा केला असता मृत व्यक्तीच्या डोक्यात दगड आणि पेव्हरब्लॉक मारून त्याची हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले.शीळ डायघर पोलिसांना मृतदेहाजवळ एक ओला कंपनीची गाडी उभी असलेली आढळून आली. तपासादरम्यान पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून ओला कंपनी मार्फत मृताची ओळख पटली. ओला चालकाचे नाव मोहम्मद अली अन्सारी असून तो घाटकोपर मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले. डायघर पोलिसांच्या तपासाची सूत्रे हलली. आरोपींनी ओला बुक केल्याने त्यांचे लोकेशन आणि बुक केलेला मोबाईल नंबर याच्या त्रांत्रिक तपासावरून आरोपी जाळ्यात अडकले.