CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली विष्णूनगर पोलीसांची धडक कारवाई, फसवणूक करणाऱ्या आरोपींना केले शिताफिने चतुर्भुज

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM

No image available

डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरामध्ये भुरटे चोर व चैन स्नॅचिंग व ४२० च्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी कठोर तपासाच्या आदेश दिले होते.डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही अनोळखी भुरटे चोर, सराईत गुन्हेगार हे वयोवृद्ध आजी आजोबा यांना गोड बोलून चोऱ्यामाऱ्या व हातचला चलाखीने फसवत असल्याचे काही घटना घडल्या होत्या.याची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी डिबीच्या अधिकाऱ्यांना धडक कारवाईचे आदेश दिले होते.

त्यादिवशी डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयातून एक आजी दवा उपचार करून आपल्या घरी येत असताना तिला मध्येच दोन अनोळखी इसमांनी थांबविले व त्यांची विचारपूस करून ते म्हणाले की, अहो आजीबाई तुम्हाला माहिती आहे का, आमचे शेठ प्रकाश म्हात्रे हे गोरगरिबांना ११००/- रुपये व दोन साड्या सप्रेम भेट देत आहेत. तुम्ही पण आमच्या सोबत चला जवळच आहे चला तुम्हाला सुद्धा ११००/- रुपये व दोन साड्या देतो असे गोड बोलून फसवून ते एका कोपऱ्यात घेऊन गेले आणि त्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्याकडील एक लाख 900 रुपये किमतीची सोन्याची कंठी व रोख रक्कम फसवून घेऊन त्यांनी तेथून पोबारा केला.

थोड्या वेळानंतर त्या आजीच्या लक्षात आले की ,आपल्याला त्या दोघं भामट्यांनी फसविले आहे . पण आता त्यांची फसवणूक झालेली होती काय करावे हे त्यांना सुचत नव्हते म्हणून त्या सरळ विष्णुनगर पोलीस ठाण्यात आल्या आणि घडलेला प्रकार सांगितला असता त्यांच्या तक्रारीवरून गु. रजि. क्रं. २००/२०२२ भादवि.४२०,३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे गंभीर प्रकार घडत असल्याची गंभीर दखल व. पो. निरी. पंढरीनाथ भालेराव यांनी घेऊन तात्काळ एक पथक तयार केले.

गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे व पोलीस शिपाई कुंदन भामरे यांना तपास करण्याचे आदेश दिले त्यानुसार मोरे व भामरे यांनी घटना ज्या ठिकाणी घडली ते ठिकाण पाहिले व त्या आजीकडून घटना कशी घडली? कधी घडली ? आदी माहिती घेऊन तपास आरंभला. त्यांनी त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना दोन संशयित इसम डोंबिवली रेल्वे स्टेशन कडे जाताना दिसले म्हणून त्यांनी डोंबिवली लोहमार्ग पोलीसांची मदत घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यानुसार सदर व्यक्ती ह्या प्लॅटफॉर्म नंबर एक वरून टिटवाळ्याच्या दिशेने जातांना च्या गाडीत चढताना दिसल्या. त्यानुसार त्यांनी टिटवाळा ,आंबिवली,शहाड या ठिकाणी जाऊन तपास केला असता तेथील फुटेज वरून सदर इसम हे आंबिवली येथे गेले असल्याचे त्यांना समजले परंतु आंबिवली या ठिकाणी पोलीस पथकाला सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही परंतु निराश न होता त्यांनी त्या विभागातील सर्व रिक्षा चालकांची भेट घेऊन अशा वर्णनाच्या व्यक्ती तुमच्या रिक्षातून कुठे गेल्या आहे का? त्याचा तपास केला असता फुटेज मधील चेहरा बघून एक रिक्षावाला म्हणाला की साहेब हा तर माझ्या रिक्षामध्ये बसून बनलेली इथपर्यंत गेला होता मग पोलीस पथक बनेली गावामध्ये गेले त्या ठिकाणी असलेल्या चौकात सीसीटीव्ही फुटेज नव्हते परंतु तेथील एका माजी नगरसेवकांच्या कार्यालयात जाऊन तेथील फुटेज पाहिले असता संशयित दोन इसम अर्ध्या तासाच्या अंतराने एका हॉटेलमधून बाहेर येताना दिसले व पुन्हा ते एका रिक्षात बसून गेले परंतु कुठे गेले हे त्यांना समजून येत नव्हते .

अशा या क्रिटिकल असलेल्या गुन्ह्यात पोलीसांनी सीसीटीव्ही मधील रिक्षाची ओळख पटवून त्या रिक्षा चालकाला माहिती विचारली असता त्याने त्या लोकांना कुठे सोडले ते ठिकाण दाखवले त्या ठिकाणी पोलीसांनी चौकशी केली असता त्यांना समजले की अशा प्रकारचे काही इसम व महिला त्या परिसरातील काही चाळीमध्ये राहायला आहे .*फौजदार कुलदीप मोरे व पोलीस शिपाई कुंदन भामरे* यांच्या चाणाक्ष नजरेने आरोपी हेरला परंतु तोच इसम आहे का? याची खात्री नव्हती तेवढ्यात रिक्षा चालक तिथून काहीतरी बहाना बनवून पळाला व फोनवरून तो म्हणाला की ,साहेब त्या घरात बसलेली व्यक्ती ही तीच संशयित व्यक्ती आहे तुम्ही तिला पकडा आणि पोलीसांनी त्या चाळीच्या मालकाला बोलवले आणि पर्यंत त्या घरातील काही महिला पळून गेल्या पण दोन इसमांना त्यांनी पकडले.

पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे व पोलीस शिपाई कुंदन भामरे यांनी जवळजवळ 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेज तपासून बनेली टिटवाळा या ठिकाणी रिक्षा चालक व स्थानिक रहिवासी यांच्या मदतीने आरोपी यांचे सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्या आधारे कट्टू गणेश पवार वय 35 वर्ष व राजेश शशीराव पवार व २७ वर्षे राहणार दोघेही पवार बंगल्याच्या जवळ शाहू यांची खोली रूम नंबर ६, बनेली गाव टिटवाळा जिल्हा ठाणे यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले यापूर्वी त्यांच्यावर विष्णूनगर पोलीस ठाणे व मानपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले.सदर आरोपी हे सोलापूर साईटचे असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात असेच गुन्हे नोंद असून यात काही महिलाही सहभागी आहेत त्यांचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.

या गुन्ह्या संदर्भात कोणताही धागा दौरा हाती नसताना फक्त फुटेजच्या आधारे 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेज न कंटाळता तपासून पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे व पोलीस शिपाई कुंदन भामरे यांनी ही कामगिरी पार पाडली.अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण चे दत्तात्रय शिंदे ,डीसीपी परिमंडळ 3 चे सचिन गुंजाळ, एसीपी डोंबिवली विभागाचे संजय कुऱ्हाडे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे सहायक पोलीस उपनिरीक्षक नाईकरे,पो.शि.कुंदन भामरे पाटणकर पोलीस हवालदार जमादार कुरणे पोलीस नाईक सांगळे लोखंडे तळवी ,डोंबीवली रेलवे RPF चे पो. उप. निरीक्षक मनोहर यांनी परिश्रम घेतले.

- राजेंद्र वखरे - 9619630035