CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मित्रांसोबत मिळून पतीनं केला पत्नीवर सामूहिक बलात्कार, सहा जण अटकेत

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM

No image available

तिरुअनंतपूरमः देशात काही राज्यांमध्ये बलात्कारच्या घटनाही समोर येत आहेत. केरळमधील तिरुअनंतपूरममध्ये पती आणि त्याच्या मित्रांनी एका महिलेवर पाच वर्षांच्या मुलासमोर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेनं पोलीसांत तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. तिरुअनंतपूरम येथे ४ जून रोजी ही घटना घडली असून, पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत पतीसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.पतीने पत्नीला दारू पाजून मित्रांसोबत बलात्कार केला, त्यानंतर पतीच्या मित्रांनीही त्या महिलेवर आळीपाळीनं बलात्कार केला. पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्रांना अटक केली असून, तिच्या पतीसह सर्व आरोपींवर अपहरण, प्राणघातक हल्ला आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुलासमोर घडली असल्याने बाल संरक्षण लैंगिक अपराध संरक्षण कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केरळ राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून, तिरुअनंतपुरम ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागविला आहे. या महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा तिला आणि आपल्या दोन्ही मुलांना गुरुवारी मित्राच्या घरी घेऊन गेला. तेथे तिला जबरदस्तीने मद्यपान करण्यास भाग पाडले आणि नंतर तिच्या मोठ्या मुलासमोर बलात्कार केले. महिलेने तेथून कसाबसा पळ काढत एका तरुणाची मदत घेतली. त्या तरुणानं महिलेला आपल्या घरी नेलं आणि पोली सांना फोन करून घटनेची माहिती दिली.