CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM
क्राईम बॉर्डर टीम
डोंबिवली : हल्ली कोण काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही .जिकडे तिकडे हरामखोरी वाढलेली आहे मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना दररोज घडत आहे.इलेक्ट्रॉनिक मीडिया व वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकार सर्व गोष्टी मांडत असतात परंतु यातून थोडेच लोक हे संदेश घेतात आणि बाकीचे येरे माझ्या मागल्या. अलीकडे खूनाचे प्रकार वाढीस लागले आहेत. मध्यंतरी कोरोना मुळे सगळीकडे शांतता होती परंतु पुन्हा आता खून व खूनाचे प्रकार ,भानगडी चव्हाट्यावर येऊ लागलेल्या आहे.बरं यात जास्त भरणा हा खूनाचा आहे . लोकांनी नीतिमत्ता गहाण ठेवल्याचे दिसत आहे .खूना मागचे जास्त कारण हे अनैतिक संबंध, प्रेम प्रकरण हेच दिसून येते. अनैतिक संबंधाच्या पुढे नातीगोती ही शून्य झाल्याचे बघायला मिळत आहे.
दुसरा प्रकार हा एकतर्फी प्रेमाचा आहे बहुतेक वेळा एक तर्फी प्रेम म्हटल्या जाते परंतु कुणीही बोट दिल्याशिवाय दंड पकडत नाही हेही तेवढेच खरे आहे.
एक तर्फी प्रेमातून राजस्थान येथे जीवे ठार मारण्याची सुपारी देणाऱ्यास डोंबिवली येथून ठाणे क्राईम ब्रांच कल्याण युनिट ३ व उल्हासनगर युनिट ४ च्या पथकाने नुकतेच एकाला गजाआड केले असून त्याला राजस्थान पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे. त्याबाबत पोलीस सूत्रांनुसार सविस्तर वृत्त असे की, डोंबिवली येथे सन २०१८ ते २०२० या कालावधीत आदित्य जैन हे आपल्या कुटुंबासह राहायला होते. त्यांचे एक दुकान होते त्या दुकानांमध्ये ते किंवा त्यांची पत्नी ,असायची त्या दुकानात कमलेश हा जात येत असायचा त्याला जैन यांची पत्नी आवडू लागली होती आणि तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला होता. हळूहळू हि बाब जैन कुटुंबियांच्या लक्षात आली.पुढे कमलेश हा जैन यांच्या पत्नीला त्रास देऊ लागला त्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याच्या लक्षात ते येत नव्हते. त्याचा त्रास वाढल्याने शेवटी आदित्य जैन यांनी डोंबिवली वरून ते आपल्या कुटुंबासह राजस्थान येथे राहायला गेले.या गोष्टीचा कमलेश ला राग आला म्हणून त्याने या गोष्टीचा बदला घेण्याचे ठरवले व कट रचला.तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने राजस्थान येथे आदित्य जैन याचा खून करण्यासाठी सुपारी द्यायचे पक्के करून अवधपुरी ,गांधीपथ ,जिल्हा जयपुर ,राजस्थान याठिकाणी पाळत ठेवून त्याच्यावर अग्नि शस्त्राने गोळ्या घालण्याचा प्लॅनही रचला.
कमलेशने एक तर्फी प्रेमातून आदित्यला जीवे ठार मारण्याकरता एका इसमाला सुपारी दिली त्यानुसार दोन इसम राजस्थान येथे गेले आणि दि.१६ जून २०२१ रोजी आदित्य पन्नालाल जैन वय वर्षे ४१ राहणार अवधपुरी , जिल्हा जयपुर राजस्थान येथे ते दोनत्याच्या घराजवळ पोहोचले त्यावेळेस आदित्य जैन गाडी साफसफाईचे काम करत होते मारेकर्यांनी संधी साधून अग्नि शस्त्राने तीन गोळ्या आदित्यच्या दिशेने झाडल्या त्या पैकी एक गोळी आदित्य जैन यांच्या हाताला लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांनी तात्काळ राजस्थान येथील करणी विहार पोलीस ठाणे ,जिल्हा जयपुर या ठिकाणी जाऊन सदर घडलेली घटना सांगितली असता अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०७,१०९,३४ शस्त्र अधिनियम कलम ३,२५ प्रमाणे दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये फिर्यादी जैन यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते पत्नी व परिवारासह २०१८ ते २०२० या कालावधीत डोंबिवली येथे राहत असताना एकतर्फी प्रेमाचा सर्व प्रकार उघड झाला. कमलेशच्या त्रासाला कंटाळून ते सर्वजण राजस्थान येथे राहायला गेले होते. त्या रागातून कमलेश ने सुपारी दिल्याचे उघड झाले .
सदर गुन्ह्याचा तपास कामी राजस्थान येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर गुन्ह्याच्या तपास कामी मदत करणे बाबत आणि आरोपीचा शोध घेण्याबाबत सहाय्य मिळावे यासाठी विनंती केली होती.
त्यानुसार ठाणे क्राईम ब्रँच कल्याण युनिट - ३ , चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन आणि उल्हासनगर युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सदर कामी तपास करू लागले त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरून डोंबिवली पश्चिम येथून कमलेश शेषराव शिंदे ,देवीचा पाडा यास ताब्यात घेतले असून पुढील तपास कामी त्याला राजस्थान पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई शाखा ठाणे शहर चे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मुद्गुल , गणेश तोरगल, मोहन कळमकर,ए .एस .आय पालांडे, पोलीस हवालदार- दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप,राजेंद्र खिलारे,मंगेश शिर्के,गुरुनाथ जरग, अजितसिंग राजपूत, कोरडे यांनी परिश्रम घेतले.
कल्याण डोंबिवली परिसरातील गुंडांवर क्राईम ब्रांच युनिट-३ चा वचक बसला असून या पथकाचे नेटवर्क मजबूत असल्याने आरोपी हे पटकन जाळ्यात सापडतात. या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मोठमोठे गुन्हे उघड केल्याने परिसरात त्यांच्या कामगिरीवर आदराचे स्थान निर्माण झाले आहे.