CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

Aurangabad Man Killed His Wife: धक्कादायक औरंगाबाद येथे चारित्र्याच्या संशयावरून दुसऱ्या पत्नीची पतीने वरवंट्याने केली हत्या ( Man Killed His Wife )

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM

No image available

CRIME BORDER NEWS NETWORK

औरंगाबाद : अलीकडे चारित्र्याच्या संशयावरून हत्या करण्याच्या घटनेत वाढ झालेली दिसत असून हत्येचे नेमके कारण चारित्र्याचा संशय असल्याचे पुढे येत आहे.हत्या झालेली व्यक्ती व हत्या करणारा व्यक्ती हे एकतर पती-पत्नी असतात किंवा प्रियकर-प्रेयसी असतात त्यांनी एकमेका सोबत घालवलेले क्षण व कालावधी याचा विचार न करता तसेच चारित्र्याची पडताळणी न करता रागाच्या भरात ते आपल्या जोडीदाराचा खून करून मोकळे होतात व नंतर त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येते.अशाच प्रकारे औरंगाबाद मध्ये घटना घडली आहे.

शेख खलील शेख इस्माईल, राहणार गारज ,तालुका वैजापूर ,जिल्हा औरंगाबाद , हल्ली मुक्काम 21 बायजीपुरा असे असून खलील हा एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये ड्रायव्हरचे काम करतो सन २००९ साली त्याने अंजुमशी लग्न केले ‌. लग्नाच्या एक वर्षानंतर अंजुमला समजले की खालीलचे पहिले लग्न झाले असून त्याला दोन मुले व एक मुलगीही आहे. यावरून त्यांच्यात वादही होत होता.एवढे करूनही खलील हा पत्नी अंजुच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. दि.२७ मार्च रविवारी सकाळी अंजुम खलील शेख वय वर्ष 35 ही मुलांना चहा देत असतांना त्या दोघांमध्ये घर खाली करण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात खलील याने घराच्या बाहेर असलेल्या पाट्याचा वरवंटा आणून अंजुम च्या डोक्यात हाणला अंजुम मी रक्तबंबाळ होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली ते पाहून खलीलने तेथून पळ काढला.

दरम्यान शेजाऱ्यांनी जखमी अंजुमला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला घाटी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तेथून तिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता जखमी अंजुमचा रुग्णालयात उपचार दरम्यान साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मयत घोषित केले.चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून हत्या ( Man Killed His Wife ) केल्याची घटना बायजीपुरा भागात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


सदर बाब आणि अंजुमच्या भावाला समजली असता तात्काळ त्याने रुग्णालय गाठले व याप्रकरणी त्याने पोलीसात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार मयत अंजुमच्या संदर्भात जिन्सी पोलीसांनी वैजापूर तालुक्यातील निजामपूर याठिकाणी पहिल्या पत्नीच्या घरात लपून बसलेल्या खलील आला अटक केली आहे