CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM
crime border news network - Husband Wife Double Murder - Double Murder in Akloli-पती-पत्नीचे दुहेरी हत्याकांड,ठाणे जिल्हा हादरला
BHIVANDI : भिवंडी तालुक्यातील गणेशपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकलोली गावाच्या विभागात असलेल्या पेंढारी पाडा येथे राहात असलेले वयोवृद्ध बाळू पाटील आणि त्यांची पत्नी यांचा निर्घुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या हत्याकांडामुळे ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा वृद्धांच्या सुरक्षेबाबत चा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बाळू पाटील आणि त्यांच्या पत्नी ची हत्या झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आलेली आहे सदर घटनेची गणेशपुरी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून वृद्ध दाम्पत्याचे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले असून अज्ञात आरोपी तान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशेष बाब म्हणजे वृद्ध दाम्पत्याच्या घरातील टीव्ही सुरू होता आणि त्या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात वाढलेले पोलिसांना आढळले आहे त्यामुळे हा खून कोणी व का केला हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
Husband Whife Double Murder