CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM
CRIME BORDER NEWS NETWORK
निलगिरीस ( तामिळनाडू ) : तिला आई कसे म्हणावे तीने विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी आपल्या मुलाची निर्दयी हत्या केल्याच्या आरोपाखाली ३८ वर्षीय महिलेला उटी बी १ पोलीस पोलीसांनी अटक केली.
पोलीस सूत्रानुसार नुसार, "गेल्या महिन्यात १४ तारखेला उटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात बाळाचा मृत्यू झाला. त्याच्या आईने सांगितले की, बाळाला आरोग्याच्या समस्या होत्या. पण , मुलाच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे या मृत्यूबाबत पोलीसांना शंका निर्माण आली .याप्रकरणी उटी बी १ - पोलीसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. तेव्हा पोलीस तपासात अनेक धक्कादायक सत्य समोर आले.
गैरसमजातून आरोपी महिलेने तिच्या पतीला सोडले होते. त्यानंतर तिचे एका पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध होते आणि तिने त्याच्याशी लग्नही केले. त्याशिवाय, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अनेक अफेअर्स होते. या सर्व अफेअर्समुळे ती नेहमी सोशल मीडियावर व्यस्त असायची. त्यामुळे तिला तिचे एक वर्षाचे मुल तिच्या आयुष्यात अडथळा वाटत होते. त्यामुळे तिने मुद्दाम मुलाची हत्या केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, तिने मुलाला बेदम मारहाण केली आणि खूप अन्न आणि दारू पाजली. त्यामुळे गुदमरून मुलाचा मृत्यू झाल्याचे तपासात उघड झाले."अनेक विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेने तिच्या अवघ्या एक वर्षाच्या मुलाचा जीव घेतला. तामिळनाडूतील निलगिरीस भागात ही घटना घडली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------