CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
मुंबई : वकारअहमद निसार सुर्वे हे सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशन फ्लॅट फार्म १ वर ११.५७ वा. आलेल्या ठाणे स्लो लोकल गाडीच्या गार्ड बाजूकडील दुसऱ्या जनरल डब्यात चढून सीटवर बसले व बसून फोनवर बोलत असतांना ही लोकल गाडी भायखळा रेल्वे स्थानकात १२.०२ वाजता च्या दरम्यान येत असताना एक इसम वय अंदाजे २४/२५ वर्ष याने लोकल मध्ये चढून वकारअहमद निसार सुर्वे यांच्या हातातील मोबाइल खेचून तो हिसकावून पळून जाऊ लागला असतांना वकारअहमद हे जोर जोरात चोर ...चोर... चोर. ..असे ओरडू लागले असता भायखळा रेल्वे स्टेशन वर कर्तव्यावर असलेल्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या महिला पो. हवा. ब.नं.१०६९ चिकणे व महिला पो. हवा. ब. नं.२५२४ बी.एम. निमळेकर यांनी प्रसंगावधान राखून त्याचा पाठलाग करून त्याला रंगेहात पकडले व त्याला वरिष्ठांच्या समोर हजर केले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे नाव अविनाश यादव वय २४ वर्ष राहणार धोबीघाट कस्तुरबा हॉस्पिटल चे समोर चिंचपोकळी पश्चिम मुंबई असे समजले.
नमूद आरोपीवर सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७/ २०२२ कलम ३९२ भा.द.वि. कलम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याने यापूर्वी अशा प्रकारचे काही गुन्हे केले आहेत का? याची चौकशी पोलीस करीत आहेत.
विशेष म्हणजे व महिला पोलीस हवालदार एस.पी.चिकणे व बी.एम.निमळेकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकात नियुक्ती केल्यापासून पाच दिवसांमध्ये दोन आरोपीताना रंगेहात पकडले आहे. सदर कामगिरीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार यांनी या दोघांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करत त्यांचा सत्कार केला.अशा या निडर डॅशिंग महिला पोलीस हवालदारांचे सर्वत्र कौतुक होत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार हे नेहमीच कर्तव्यदक्ष असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना प्रेरणा देत असतात.