CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

लॉजमध्ये अल्पवयीन प्रेयसीची खून करून प्रियकराची ट्रेनखाली आत्महत्या

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM

No image available

ठाणे : वसईच्या कळंब येथील हार्दिक लॉजमध्ये प्रियकराने अल्पवयीन तरुणीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्येनंतर तिच्या फरार झालेल्या प्रियकराने ट्रेनखाली आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अभिषेक शहा (वय २१) असे या मयत प्रियकराचे नाव आहे.नालासोपारा पश्चिमेच्या कळंब येथे हर्षद फार्म हाऊस अर्थात लॉज आहे. अभिषेक शहा (वय २१) हा तरुण त्याच्या १७ वर्षीय प्रेयसीला या लॉजमध्ये घेऊन आला होता. काही वेळाने तो जेवण आणण्यासाठी लॉजच्या बाहेर गेला,बराच वेळ झाला तरी तो परतला नाही,म्हणून लॉज मालकाने खोलीत जाऊन पाहिले तेव्हा त्याची प्रेयसी मृतावस्थेत पडली होती.

सदर घटना पोलीसांना कळविण्यात आली. पोलीस या फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत होते, मात्र त्यानेही ट्रेनखाली आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.मृत तरुणी ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. लॉजिंगमध्ये या अल्पवयीन तरुणीला प्रवेश कसा दिला ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले होत आहे. मात्र, या घटनेवरून कळंब गावात लॉजिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे .