CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

Wardha Lover Couple Suicide : प्रेमी युगलाची कुटुंबीयादेखत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM

No image available

CRIME BORDER NEWS NETWORK

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात असलेल्या बेला येथे महेश शालीक ठाकरे वय २६ वर्ष हा राहायला आहे . तर जवळच असलेल्या गावात एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी राहाते . महेश ठाकरे हा वनात गुरंढोरं राखण्याचे काम करतो. तर मुलगी ही इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. या दोघांची ओळख झाली आणि ते दोघं सतत एकमेकांच्या संपर्कात आल्याने दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ते दोघे जण वेळ मिळेल तेव्हा एकमेकाला भेटत असत परंतु त्या दोघांना कुटुंब एकत्र येऊ देणार नाही याची खात्री पटताच त्या दोघांनी ठरवून शुक्रवारी घर सोडले व ते गावातून पळून गेले. मुलगी गावातील महेश ठाकरे सोबत पळून गेल्याचे तिच्या समजले.

आपल्या मुलीला पळूवून नेले याची खात्री पटताच मुलीच्या घरच्यांनी महेशने मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली पोलीस . कुटुंब त्या दोघांचा शोध घेऊ लागले परंतु मुलगी कुठेच मिळून आली नाही परंतु यापूर्वी त्या दोघांनी कुटुंबियांना बोलून सांगितले होते की तुम्ही आमच्या प्रेमाला समजून घेणार नाही म्हणून आम्ही घर सोडून देऊ आणि त्यांनी तसेच केले.

कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरूच ठेवला याच दरम्यान त्यांना सोमवारी सायंकाळी बेला गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतात दोघेही लपून बसल्याची माहिती मिळाली असता त्यांचा शोध घेत घेत कुटुंब गेले ते तेथील कुर्ला परिसरात त्यांच्यापर्यंत पोचले. आपले कुटुंब आपल्याला पकडण्यासाठी आले आहेत ते आपल्याला एकत्र जगू देणार नाही असे त्यांना वाटत होते .

घरचे लोकं दिसताच त्या दोघांनी कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता जवळच असलेल्या खोल विहिरीत उडी घेतली. कुटुंबादेखत त्या दोघांनी विहिरीत उडी घेतल्याने कुटुंब हवालदिल झाले. या मध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला. सदर घटना ही समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले पोलीसांनी विहिरीतून दोघांचे मृतदेह काढून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलेअशाप्रकारे एका २६ वर्षीय तरुणाने व त्याची १६ वर्षीय अल्पवयीन प्रेयसी या दोघांनी आत्महत्या केली.या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.