CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM
CRIME BORDER NEWS NETWORK
Murder : डोंबिवली जवळील दावडी गावात विवाहित महिलेचा निर्घृण खून-मृतदेह घरातील सोफ्यातआढळला महिलेची हत्या करण्यात आली. (Dombivali Murder News)डोंबिवली जवळील दावडी गावात शिवशक्ती नगर परिसरातील ओम रेसिडेन्सी मधील बी विंगमध्ये सुप्रिया शिंदे या विवाहित महिलेचा निर्घृण खून करून मृतदेह सोफासेटमध्ये कोंबलेला आढाळल्याने खळबळ उडाली आहे. मानपाडा पोलीस पोलीसांनी तात्काळ तपस आरंभला .
डोंबिवली : सुसंस्कृत आणि सुशिक्षीत लोकांचे शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवली जवळील दावडी गावात शिवशक्ती नगर परिसरातील घटना काळजाचा थरकाप उरवणारी घटना उघडकीस आल्याने खडबड उडाली आहे . डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथे एका महिलेचा निर्घृणपणे खून ( Murder) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर त्या महिलेचा खून करुन त्या महिलेचा मृतदेह तिच्याच घरातील सोफ्यामध्ये दडवून ठेवल्याचे निदर्शनास आले. प्राप्त माहितीनुसार, शिवशक्ती नगर परिसरातील ओम रेसिडेन्सीच्या बी विंगमध्ये हा प्रकार घडला.
याठिकाणी राहणारे किशोर शिंदे kishor shinde हे सकाळी कामावर गेले होते.त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती तर त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. संध्याकाळी किशोर शिंदे हे कामावरुन घरी परतले. तेव्हा त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात दिसली नाही. किशोर शिंदे यांनी तिचा आजूबाजूला व परिसरात शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही. एव्हढेच नव्हे तर त्यांनी मित्रमंडळी व नातेवाईकांसह सगळीकडे विचारपूस व तपास केला . पण सुप्रिया Supriya मिळून आली नाही . याच दरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक घरात आले. किशोर शिंदे हे पत्नी हरविल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात गेले होते. दरम्यान शेजाऱ्यांना सोफा विस्कटलेल्या व्यवस्थेत दिसून आला आणि त्यांनी तो सोफा चाचपला असता सर्वाना धक्का बसला. कारण सुप्रिया हिचा मृतदेह सोफ्यात कोंबून ठेवला होता. सुप्रिया हिचा गळा आवळून केल्याचा अंदाज आहे .
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर व.पो.निरीक्षक शेखर बागडे, पो.नि.अनिल पडवळ आणि पो.नि.अविनाश वनवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.सुप्रिया किशोर शिंदे Supriya kishor shinde हिचा मृतदेह शव विच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे.अखेर तिची हत्या कोणी व कशासाठी केली? तिच्यासोबत काही गैरप्रकार झाला आहे का ? याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेऊन पोलीसांकडून विचारपूस सुरु आहे.
खुनाचं कारण काय?
सुप्रिया हिचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला आहे. तिचा खून कोणी व कशा करीता केला तिच्या बाबतीत काही गैर प्रकार झाला आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणात पोलीसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे .
या पूर्वीही सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता-डोंबिवलीत या पूर्वीही एका सूटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत एकालाताब्यात घेतले होते . शरीस संबंधास नकार दिल्यानं महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह हा सुटकेसमध्ये ठेवण्यात आला होता. या खून प्रकरणी पोलीसांनी एका २८ वर्षीय इसमाला ताब्यात घेतलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना डोंबिवलीत घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.