CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
कल्याण : - कल्याण कोळसेवाडी परिसरात अल्पवयीन १६ वर्षीय पीडित मुलगी तिच्या कुटूंबासह राहते. तिच्या नराधम बापाचा भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे मुलीची आई ६ महिन्यापूर्वी मूळ गावी उत्तरप्रदेशात गेलेली आहे. तसेच नराधम भावाची बायको सुद्धा माहेरी गेली आहे. याच संधीचा फायदा घेऊन नराधम बाप लेकानी पीडित मुलीला बेदम मारहाण करून मारून टाकण्याची धमकी देऊन २३ वर्षीय तिच्या नराधम भावाने लैगिंक अत्याचार केला.
पोटच्या मुलीवरच सख्या बापासह भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. या संधर्भात कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल जाला असून नराधम बाप लेकाला पोलीसांनी गजाआड केले आहे.खळबळजनक बाब म्हणजे गेल्या ६ महिन्यापासून तिच्यावर हे नराधम अत्याचार करत होते. दरम्यानच्या कालावधीत या मुलीने तिच्यावर घडलेला प्रसंग आईलाही सांगितला . दोघा नराधमाने तीला विवस्त्र करून घरातच बेदम मारहाण केली.
नात्याला काळीमा फासणाऱ्या या नराधमांचे वाढत्या अत्याचाराने भयभीत होऊन परिसरात राहणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती तिने दिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस. त्यानंतर काही सामाजिक महिला कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित मुलीने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून तिच्यावर घडलेल्या प्रकार सांगितला तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी नराधम बाप लेकावर अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून (शनिवारी) रात्रीच्या सुमारास दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. बाप आणि भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.