CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

व.पो.नि.सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.जालिंदर साळुंके यांची उत्तम कामगिरी

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

व.पो.नि.सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.जालिंदर साळुंके यांची उत्तम कामगिरी-भिवंडी क्राईम ब्रॅंचने जिलेटिन व डेटोनेटर स्फोटकासह आरोपीस ठोकल्या बेड्या

ठाणे : भिवंडी क्राईम ब्रँचला कार्यरत असलेले पोलीस कॉन्सटेबल जालिंदर वसंत साळुंके ब . नं ६६३२ हे डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी खबऱ्यांचे मोठे नेटवर्क तयार केले आहे. पो.कॉ.जालिंदर साळुंके यांना त्यांच्या गुप्त खबऱ्यांने माहिती दिली की, जिलेटिन व डिटोनेटर हि स्फोटके विक्रीसाठी काही इसम एका गाडीमधून घेऊन येणार आहेत. खबर १०० टक्के पक्की आहे, त्यासंदर्भात साळुंके यांनी संपूर्ण माहिती घेऊन, क्षणाचाही विलंब न करता तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना सदर घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून माहितीच्या अनुषंगाने सापळा लावण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिले. त्यानुसार दिनांक -१ फेब्रुवारी २०२२ रोजी क्राईम ब्रँचच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारीच नदी नाका ,पोलीस चौकी समोर,भिवंडी या ठिकाणी गुप्त सापळा रचला व ते सवजाची वाट पाहू लागली बराच वेळ वाट बघूनही संशयित दिसत नव्हते पण बातमी मात्र पक्की होती .

साधारणतःदुपारी ३.०० वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहिती नुसार मारुती इको कार क्रमांक MH-04/FZ-9200 ही दिसताच तिला थांबविण्यात आले.त्या गाडीत असलेल्या तिघा तरुणांना ताब्यात घेऊन पंचा समक्ष गाडीची पाहणी करण्यात आली असता

१) जिलेटिन चे ५ बॉक्स मिळून आले. त्यामध्ये २०० नग, एकूण १००० नग ,२०,०००/- रुपये किमतीचे २). १००० नग डेटोनेटर २५०००/-रुपये किमतीचे ३). मारुती इको कार क्रमांक MH-04/FZ-9200 ,४,००,०००/- रुपये किमतीची स्फोटकांचा पंचनामा करून सुरक्षित रित्या जप्त करण्यात आले व तात्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथकाला ठाण्याहून तपासणीसाठी बोलावण्यात आले. प्राथमिक तपासामध्ये सदर स्फोटके आरोपींनी चोरी करून विक्रीसाठी नेत असल्याचे उघड झाले.

त्या तिघांना अधिक माहितीसाठी ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता. त्यांची नावे १) अल्पेश उर्फ बाल्या हिराजी पाटील वय वर्ष ३४ राहणार आपटी खुर्द, ता.विक्रमगड, पालघर,२) पंकज अच्छेलाल चौहान वय वर्षे २३ राहणार विक्रमगड, जरिमरी नगर ,जिल्हा पालघर ३).समीर उर्फ सम्या रामचंद्र वेडगा वय २७ वर्ष राहणार वेडगेपाडा ,तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर असल्याचे समोर आले.त्यांच्याकडून सुमारे एकूण ४,४५,०००/- रुपये माल किमतीची विनापरवाना बेकायदेशीररित्या स्फोटके ही इको मारुती मधून चोरून विक्री घेऊन जात असतानां यशस्वीरित्या जप्त करण्यात आली असून नमूद इसमा विरुद्ध निजामपुरा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम २८६ सह भारताचा स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५ अन्वये दाखल करण्यात येत असून सदर गुन्ह्याचा सखोल तपास सुरु आहे.सदरची उत्तम कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी क्राईम ब्रँच युनिट - २ च्या पथकाने केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक राजेंद्र वखरे ,डोंबिवली ९६१९६३००३५