CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बालिका व बालकासोबत विकृत लैंगिक कृत्य करणाऱ्या नराधमास नागरिकांनी रंगेहात पकडून दिले पोलीसांच्या ताब्यात

CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM

No image available

CRIME BORDER NES NETWORK

कल्याण : लैंगिक विकृती ही माणसाला जीवनातून कायमचीच उठवते हे आपल्याला बऱ्याच घटनांमधून बघायला मिळत असते .परंतु ज्या बालकांनी अजून या जगाची ओळखही करून घेतलेली नाही लैंगिक विषय हा त्यांना माहितही नसतो अशा या बालमनावर कायमचेच आघात कोरल्या जातात. त्यांच्या वेदना आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही परंतु अजूनही असे नराधम आपल्या आसपास फिरत असतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही.अशाच एका विकृत तरुणाने एका बालिकेवर व बालकावर विकृत लैंगिक कृत्य केल्याची घटना घडली आहे.

विठ्ठलवाडी जवळील आशेळे गावात सुधीर राहायला आहे. त्याच्या घरी आई-वडील, भाऊ सगळे असतात.सुधीर वय वर्षे २४ हा तरुण तसे पाहता रिकामटेकडा असल्याने तो फक्त इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरत असायचा. त्याचे आई-वडील व भाऊ त्याला खायला प्यायला देत असल्याने त्याची चंगळ होती तशी त्याच्या घरची परिस्थिती नाजूक असल्याने त्याने दोन पैसे कमवावे असे त्याच्या घरच्यांना वाटत होते पण सुधीरच्या डोक्यात ही गोष्ट जात नव्हती तो ऐतखाऊ पणा करीत होता .

कोरोनाच्या दृष्टचक्रामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बदलली असल्याने खाण्यापिण्याचे ही वांदे झाल्याचे आपण बघत आहोत. सुधीर व त्याचे कुटुंब ही या दुष्टचक्रातून सुटलेले नाही त्याच्या घरच्यांनी त्याला काम शोध ,काम शोध असा त्याला तगादा लावल्याने तो कामाच्या शोधात भटकू लागला तो विठ्ठलवाडी , उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरात विविध ठिकाणी काम मिळतं का? यासाठी शोधाशोध करू लागला ,परंतु त्याला कुठेच काम मिळाले नाही.

तो अंबरनाथ पूर्वेतील मधील झोपडपट्टी जवळ आला त्याच्या डोक्यात अनेक विचार चालू होते तो तरुण असल्याने त्याची पोटाची भूक तर भागत होती, पण पोटाखालची भूक त्याला स्वस्थ बसू देत नसल्याने आपली ही व्यवस्था कुठे होते का याच्या शोधात तो होताच परंतु त्याचे ईप्सित साध्य होत नव्हते.त्याची लैंगिक वासना शमविण्यासाठी त्याला कुण्या स्रीची गरज होती पण त्याच्याजवळ पैसे नसल्याने त्याचे कोणतेच शोक पूर्ण होत नव्हते. म्हणून त्याने विचार केला कि ,आपण आपले लैंगिक सुख हे गुपचुपपणे खेळत असलेल्या मुलींकडून पूर्ण करून घेऊ. शकतो . तो अशा संधीच्या शोधात होता.आणि त्याला ते संधी चालून आली होती.

त्यादिवशी अंबरनाथ झोपडपट्टीतील कु. निकिता वय ११ वर्ष व निमिश वय ७ वर्ष हे दोन बालके बाहेर रस्त्यावर खेळत होती ,आजूबाजूला शांतता होती तसेच त्या परिसरामध्ये फारशी वर्दळही नव्हती बाजूलाच एक निर्मनुष्य नाला आला आहे.झोपडपट्टीतील मुलं ही कशालाच घाबरत नाही ते त्याठिकाणी निर्धास्तपणे खेळत होती .त्यांच्याकडे पाहून सुधीरची कामवासना जागृत झाली. त्याने आजूबाजूच्या परिसराचा कानोसा घेऊन आपण आपली वासना यांच्या कडून पूर्ण करून घेऊ शकतो असे मनोमन पक्के केले .त्यासाठी त्याने त्या मुलांना चॉकलेट व पैशांचे आमिष दाखवण्याचा मनसुबाही रचला . तो त्या बालकांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी गोड गोड बोलू लागला तो गोड बोलत असल्याने कु. निकिता व निमिश हे दोघेही त्याच्याशी बोलू लागले तेव्हा सुधीर त्यांना म्हणाला की ,चला माझ्यासोबत माझ्याकडे चॉकलेट आहेत .मी तुम्हाला चॉकलेट देतो व खाऊसाठी पैसेही देतो आपण जाऊन एका ठिकाणी बसून सर्व मिळून चॉकलेट खाऊ असे त्याने त्यांना आमिष दाखविले शेवटी ती लहान बालके यांना सुधीरच्या मनातील कुटील डाव समजणारच नव्हता ते त्याच्याबरोबर जाऊ लागले त्याने जवळच असलेल्या निर्जन अशा नाल्यात नेले तिथून लोकं जात येत होते ,परंतु आत मध्ये कोणीही येणार नाही याची त्याला खात्री होती .त्याने त्या दोघांनाही तेथे नेऊन धमकावले व त्यांना धाक दाखवत खाली बसवले तो कु. निकिता च्या सोबत अंगचटीला येऊ लागला त्याने हळूहळू तिला तिच्या अंगावरील सर्व कपडे काढायला भाग पाडले. ते दोघं मुलं रडू लागली होती पण तो त्यांना म्हणाला की तुम्ही रडले तर मी तुम्हाला इथेच मारून टाकीन जीवाच्या भीतीने ते दोघेही ही गप्प बसले कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.या विकृताने कु. निकिताच्या शरीराच्या प्रायव्हेट भागास छेडछाड सुरू केली. तिच्या प्रायव्हेट भागात बोट घातली या विकृताचे अश्लील कृत्य शब्दात लिहिणेही योग्य नाही असे कु. निकिता व निमिश सोबत सुरू केले . शीलाला होत असलेल्या या त्रासामुळे ती जोरजोराने रडू लागली तर संदेशही रडू लागला त्यांना तो त्रास सहन होत नव्हता .रस्त्यातून जाणाऱ्या-येणाऱ्यांना नाल्यातून रडण्याचा आवाज येऊ लागला त्या आवाजामुळे लोकं तिथे थांबू लागली हळूहळू त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली.मग काहीजणांनी हिम्मत करून नाल्यात जायचा निर्णय घेतला ते खाली उतरताच एका आडोशाला एक मुलगी व मुलगा नग्नावस्थेत त्यांना दिसून आली तर त्यांच्यासोबत अनैतिक लैंगिक कृत्य करताना एक युवक दिसला तात्काळ त्या लोकांनी त्याच्याकडे धाव घेतली लोकं येतांना त्याला दिसताच तो तेथून पळून जाऊ लागला ,परंतु काही तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व तिथेच त्याला बेदम चोप द्यायला सुरुवात केली .कु. निकिता व निमिश ने कपडे घातले त्या दोघांना लोकांनी धीर दिला व ताबडतोब त्या दोघी लहान बालकांना घेऊन व हया विकृत तरुणास बेदम चांगला चोप देऊन अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात न्यायचे त्याने ठरविले. परंतु ते पोलिस ठाण्यात जायच्या अगोदरच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.

त्यावेळी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून सपोनि. जयेंद्र भोयर हे कर्तव्यावर होते.कुण्यातरी दक्ष नागरिकाने पोलीस ठाण्यात निनावे फोन करून सदर घटनेची माहिती दिली असता ताबडतोब शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीसांनी लोकांची गर्दी पाहून काहीतरी विपरीत घडले असावे असा त्यांनी अंदाज घेतला त्यातील काही दक्ष नागरिकांनी त्या दोघा बालकांना पोलीसांसमोर उभे केले व त्या विकृत तरुणालाही उभे केले आणि त्याने केलेले कृत्य व ज्या लोकांनी प्रत्यक्ष बघितले होते ते सर्व त्यांनी पोलीसांना सांगितले.या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि हळूहळू लोक पोलीस स्टेशन समोर जमू लागली परंतु सपोनि. जयेंद्र भोयर यांनी सर्व लोकांची समजूत घालून त्यांना परत पाठविले व सदर आरोपीस कायदेशीर योग्य ती शिक्षा होईल याचा विश्वास दिला.

सपोनि. जयेंद्र भोयर यांनी ताबडतोब सदर घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली. सदर घटना ही नाजूक व बालकांच्या सुरक्षेची व कुकृत्याची असल्याने परिसरातील वातावरण बिघडवणारी असल्याने व तात्कालीन वपोनि. मनजीतसिंग बग्गा यांनी त्या बालकांची भेट घेऊन पुढील कारवाईचे आदेश त्यांनी दिले. ‌सदर बालकांना वैद्यकीय उपचारासाठी व पुढील तपासणीसाठी पोलीसांनी ताबडतोब उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात त्यांना घेऊन गेले तर विकृत अशा सुधीरला लोकांनी चांगला चोप दिला असल्याने तोही जखमी झाला होता त्यालाही उपचारासाठी सरकारी दवाखान्यात उल्हासनगर येथे नेण्यात आले तिथे त्याला डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतले व त्याच्यावर उपचार सुरू केले सुधीर हा ४ दिवस उपचारासाठी रुग्णालयात होता . त्यानंतर पोलिसांनी त्याला रीतसर अटक केली आणि आणि त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सुधीर च्या विरोधात शिवाजीनगर अंबरनाथ पोलीस ठाण्यात भा. द .वि . ३७६, (२),३७७,३५४,३२३,५०६ आणि क्रिमिनाल लॉ अमेंडमेंत अॅक्ट २०१८ चे भा.द.वि .कलम ३७६ (एबी) ,पॉक्सो कलम ४,६,८ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. परंतु पोलीसांनी हे प्रकरण खूप चांगल्या पद्धतीने हाताळल्याने पुढील अनर्थ टळला . सदर प्रकार हा पोक्सो अंतर्गत व बालकांच्या लैंगिक अत्याचाराचे असल्याने ॲडिशनल सी पी, डीसीपी, एसीपी या सर्वांनी या प्रकरणात लक्ष घातले व शिवाजीनगर पोलिसांना सूचना देऊन मार्गदर्शन केले.सदर घटनेचा तपास करून दोषारोपपत्र मुदतीच्या आत तपासाधिकारी सपोनि. जयेंद्र भोयर यांनी कोर्टात दाखल केले.सदर गुन्ह्यात विकृत तरुणास साधारण १४ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.

या गुन्ह्यासंदर्भात तत्कालीन वपोनि मनजीत सिंग बग्गा यांच्या नेतृत्वाखाली तपासाधिकारी सपोनिरी. जयेंद्र भोयर यांनी पो. शि. दादा वाघमारे (रायटर),पो. शि. राकेश पवार , महिला पोलीस शिपाई प्रीती धाते यांच्यासह तपास पूर्ण केला.पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनिरी.जयेंद्र भोयर हे करीत आहे.

- सीमा वखरे