CRIME BORDER | 27 December 2025 | 07:24 PM
डोंबिवलीहून राजेंद्र वखरे यांजकडून
‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ परंतु या प्रेमात अनेकांची वाताहत झालेली आपण चोहिकडेच बघत असतो. प्रेमात आंधळ्या झालेल्या प्रेमविरांना आपल्या कर्तव्याचा विसर पडतो. आणि त्यांच्या हातून नको तो अनर्थ घडतो. हे भूतलावर चोहिकडेच चालले आहे. कामातुराणां न भय न लज्जा! अशी एक म्हण आहे. वासना ही माणसाला आयुष्यातून कायमचे उठविते हे सर्वांनाच माहित असूनही काम वासनेच्या नादी लागून एका विवाहितेने आपल्या पतीचा तिच्या प्रियकराच्या मदतीने निर्घृन खून केल्याची घटना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
प्रवीण धनराज पाटील वय ३० वर्ष , हा राहायला रूम नंबर४०३, त्रिमूर्ती अपार्टमेंट मानपाडा पेट्रोल पंपाच्या मागे मानपाडा गाव डोंबिवली पूर्व येथे राहायला होता.प्रवीण हा घराबाहेर गेला तो परतलाच नाही म्हणून त्याचे नातेवाईक चिंतेत पडले होते तो हरवल्या बाबतची मिसिंग तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात गे ले व त्यांनी तो हरवल्याची तक्रार दिली.मानपाडा पोलीसांनी मानव मिसिंग रजिस्टर नंबर ११७/ २०२१ तक्रार दिनांक ४ जून २०२१ रोजी दाखल करून घेतली आणि त्याचा तपास सुरू केला त्याचे नातेवाईक व पोलीस त्याचा शोध घेत होते.याच वेळी ठाणे क्राईम ब्रँच युनिट- ३, कल्याण हि टीम प्रवीणचा समांतर तपास करीत होती.
प्रवीणच्या नातेवाईकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती म्हणून त्यांनी ठाणे क्राईम ब्रँच युनिट- ३, कल्याण चे कार्यालय गाठले व त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांची भेट घेऊन प्रवीण चा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला असावा एवढेच नव्हे तर त्यांनी या प्रकरणात प्रविण ची पत्नी लक्ष्मी प्रवीण पाटील हिच्यावर संशय व्यक्त केला .वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी ताबडतोब चौकशीकामी प्रवीण ची पत्नी लक्ष्मी हिला चौकशीकामी कार्यालयात बोलावले तिच्याकडे महिला अंमलदार यांच्या समोर मिसिंग असलेल्या प्रवीण बाबत माहिती विचारली परंतु लक्ष्मी ही समर्पक उत्तरे न देता अडखळत बोलत असल्याने तिच्यावर पोलीसांचा दाट संशय बळावला परंतु तसे त्यांनी तिला भासू दिले नाही.पोलीसांनी लक्ष्मी प्रवीण पाटील हिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्या नातेवाईकांचे सुद्धा मोबाईल नंबर मिळविले आणि याच वेळी प्रवीणच्या मोबाईलचे ही तांत्रिक विश्लेषण पोलीसांनी सुरू केले.
पोलीसांनी लक्ष्मीकडे प्रवीण हा घरातून गायब होण्याच्या पूर्वी दिनांक १ जून व २ जून या दोन दिवसाच्या बाबत लक्ष्मी कडे चौकशी केली असता प्रवीणच्या वास्तव्या बाबत ती खोटी माहिती व समाधानकारक माहिती देत असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. आणि लक्ष्मी पाटील क्राईम ब्रँच पोलीसांच्या रडारवर आली. प्रवीण चा घातपात झाला असावा असा पोलीसांना संशय येऊ लागला होता कारण तिच्या नातलगांनी तिच्यावर संशयाचे बोट ठेवले होते.
त्यानंतर तपासात पोलीसांच्या असे लक्षात आले की लक्ष्मीच्या संपर्कात अरविंद उर्फ मारी राम हा इसम व सनी सागर हे दोघेही तिच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले म्हणून पोलीसांनी त्या दोघांना चौकशीकामी ताब्यात घेतले आणि यांच्याकडे प्रवीण बाबत चौकशी आरंभली परंतु ते ताकास तूर लागू देत नव्हते याच दरम्यान पोलीसांना त्यांच्या गुप्त खबर्याने माहिती दिली की प्रवीणचा घातपात त्याची पत्नी लक्ष्मी व तिच्या दोन साथीदारांनी केला आहे.एवढेच नव्हे तर पोलीसांना खात्रीलायक माहिती मिळाली की अरविंद उर्फ मारी राम याचे व लक्ष्मी पाटील हिचे अनैतिक प्रेम संबंध आहेत. आणि त्याच अँगलने पोलीसांनी परिसरात व गुप्त बातमी दारा मार्फत माहिती जमविली त्या चौकशीत लक्ष्मीचे प्रेम संबंध उघड झाले होते परंतु पोलीसांना प्रविण कुठे आहे व त्याचे काय झाले याची इत्यंभूत माहिती मिळवणे गरजेचे होते.
पोलीसांनी या तिघांना वेगवेगळ्या रूम मध्ये नेऊन एकाच वेळी त्यांच्याकडे तपास सुरू केला तेव्हा लक्ष्मी व अरविंद या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे त्या दोघांनी मान्य केले आणि त्यानंतर सुरु झाला प्रवीण चा तपास.ते सर्वजण प्रवीण कुठे आहे हे आम्हाला माहीत नाही असे सांगून पोलीसांची दिशाभूल करू लागले तेव्हा त्यांना खास पोलीसी हिसका दाखविला आणि ते सुतासारखे सरळ झाले प्रवीण हा मला खूप त्रास देतो असे म्हणून लक्ष्मी अरविंदला सांगत असे प्रवीण हा लक्ष्मीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाणही करीत असे प्रवीणला असे वाटत होते की लक्ष्मीचे बाहेर कोणासोबत तरी अनैतिक शारीरिक संबंध आहेत.
आपली प्रेमीका लक्ष्मी हिला तिचा पती नेहमी शारीरिक व मानसिक त्रास देतो म्हणून अरविंदला त्याचा राग आला होता त्याने दिनांक २ जून रोजी रात्री बारा वाजेच्या दरम्यान प्रवीण पाटील च्या घरी जाऊन अरविंदने त्याचे राहते घरी त्याला आणले त्या ठिकाणी अगोदरच लक्ष्मी आलेली होती तिला पाहताच प्रवीणची तळपायाची आग मस्तकात गेली तो तिला शिव्या देऊ लागतात अरविंद उर्फ मारी राम ,सनी सागर या दोघांनी प्रवीणला हाता बुक्क्यांनी मारहाण सुरू केली नंतर त्यांनी जवळच पडलेला लोखंडी रोड उचलला व प्रवीणला त्याने मारहाण करून त्याचा गळा आवळून खाली पाडले त्याच्या गळ्यावर त्यांनी वार करून त्याला जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली त्यात तो मरण पावला प्रवीण हा मेल्याचे पाहून त्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आपापसात संगणमत करून प्रवीण चा मृतदेह एका चटईत गुंढाळून त्याला रिक्षा टाकून पाईपलाईन रोड ने बदलापूर मार्गे नेरळ जिल्हा रायगड च्या हद्दीत घेऊन गेले. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेलु गावाजवळ बदलापूर कर्जत रोडवर असलेल्या मोरी जवळ त्यांनी त्याला खाली टाकून दिला आणि तेथून ते परत आले अशी माहिती त्यांनी पोलीसांना दिली.याची खात्री करण्यासाठी ठाणे क्राईम ब्रँच युनिट ३ चे पथक त्याला घेऊन, ज्या ठिकाणी प्रवीणला फेकून दिले होते त्या ठिकाणी घेऊन गेले आरोपींने त्याचे प्रेत कुठे फेकले आहे ते ठिकाण दाखविले त्यानंतर पोलीसांनी नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन नेरळ हद्दीत अकस्मात मृत्यूची नोंद आहे का याची चौकशी केली असता नेरळ पोलीस ठाण्यात दि. १६ जून २०२१ रोजी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर २४/२०२१ , सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल असल्याचे निदर्शनास आले.
आकस्मात मृत्यूतील मयत याचे प्रेताचे ठिकाणी मिळून आलेल्या वस्तू व कपड्यावरून मयत हा मिसिंग असलेला इसम प्रवीण पाटील असल्याची खात्री पटल्याने पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुन यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३०७ /२०२ भारतीय दंडविधान संहिता कलम ३०२,२०१,३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अआरोपींना पुढील कारवाईसाठी मानपाडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले लक्ष्मी पाटील ने पती प्रवीण चा तिच्या प्रियकराच्या व साथीदाराच्या मदतीने खून केल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली त्यामुळे डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे.
दि . २ जून २०२१ रोजी लक्ष्मी पाटील ही तिचा प्रियकर अरविंद उर्फ मारी व मित्र सनी सागर यांच्यासोबत वज्रेश्वरी येथे फिरण्यासाठी गेली होती तेथून ते रात्री परत येऊन अरविंद उर्फ मारी याचे घरी गेली तिथे तिने तिचा पती प्रवीण हा तिला खूप त्रास देत असल्याचे तिचा प्रियकर अरविंद उर्फ मारी यास सांगितले तेव्हा तो प्रवीण पाटील यांच्या घरी जाऊन त्यास घेऊन आला. अरविंद च्या घरी लक्ष्मीला पाहून प्रवीणला तिचाखूप राग आला होता त्या ठिकाणी पत्नी लक्ष्मी व प्रवीण यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते.त्याच रात्री त्यांनी प्रवीणला लाथा , बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून गळा आवळून बेशुद्ध केले व त्याच्या गळ्यावर वार करून त्याला जीवे ठार मारले आणि त्यानंतर रात्री बारा वाजताच्या सुमारास प्रवीण चे प्रेत त्यांनी घरातील चटई मध्ये गुंडाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रिक्षाने तेनेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेलु गाव जवळ बदलापूर कर्जत रोडवर मोरे खाली टाकून दिले अशी सर्व हकीकत पोलीसांसमोर स्पष्ट झाली आहे.
सदर खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी ठाणे क्राईम ब्रांच युनिट ३, कल्याण चे वपोनिरी.संजू जॉन, पो.निरी.विलास पाटील, सपोनि-भूषण दायमा,पोउपनिरी- नितीन मुदमून,मोहन कलमकर,शरद पंजे,दत्ताराम भोसले,राजेंद्र घोलप, राजेंद्र खिलारे,अजितसिंग राजपूत,सचिन साळवी,सचिन वानखडे,गुरुनाथ जरग, प्रकाश पाटील,हरिश्चंद्र बंगारा,नरेश जोगमार्गे, विलास मालशेटे, ज्योतीराम साळुंके, विश्वास चव्हाण,मिथुन राठोड,मपोना-चित्रा इरपाचे,स्वाती रहाणे, यांनी परिश्रम घेतलेसदर घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे .