CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

सहा हजारांवर परदेशी पर्यटक गोव्यातून मायदेशी परतले

CRIME BORDER | 27 December | 02:20 PM

वास्को (गोवा) : लॉकडाऊन लागू करून ३० दिवस पूर्ण झाले असून, या काळात गोव्यातील अडकलेल्या सहा हजार १३२ परदेशींना मायदेशी पाठवले. यामध्ये ५४ चिमुरडेही होते. त्यासाठी ३१ खास विमानांचा वापर करण्यात आला. अजूनही विविध देशांतील सुमारे दोन हजार परदेशी गोव्यात अडकून पडले आहेत. गोवा सरकार, दाबोळी विमानतळ प्राधिकरण आदी संबंधित विभागांनी उत्तम समन्वयाने नियोजन केले आणि अंमलबजावणीही. संबंधित देशांची आणखी काही विमाने येतील आणि त्यांच्या नागरिकांना घेऊन परततील, अशी माहिती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर गोव्यातील विमानसेवा रद्द करण्यात आली.

 

परिणामी, परदेशी पर्यटक अडकले. ३१ खास विमानांपैकी दोन विमाने शुक्रवारी (दि.२४) संध्याकाळी दाबोळी विमानतळावर आल्यानंतर त्यातून रशिया तसेच लंडनमधील ४२४ पर्यटकांचा मायदेशासाठीचा प्रवास सुरू झाला. ब्रिटन, लंडन, रशिया, स्पेन, जर्मनी, पोलंड, कझाकीस्तान, इस्रायल आदी देशांतील पर्यटक मायदेशी पोहोचले.विमानतळावर खबरदारी दाबोळी विमानतळावर यथोचित खबरदारी घेतली जाते. येथे औषध फवारणी केलेली आहे, तसेच सॅनिटायझर्सचा वापर केला जातो. मास्कशिवाय प्रवेश दिला जात नाही. थर्मल गनने तपासणी केली जाते.