CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

सकारात्मक विचार....आश्रय महिला संस्था

CRIME BORDER | 27 December | 02:28 PM

ती जन्म देते. ती घडवते! ती साथ देते ,ती वचन निभावते ,ती आत्मविश्वास देते, ती प्रेरणा देते ,ती आई, बहीण ,पत्नी, मुलगी अगदी प्रत्येक रुपात ती सावली होते.

आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो.एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात.खरतरं हीच वेळ असते उठायची, आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची. कष्ट करायची. हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्तेक गोष्टींचा त्याग करायची..! AASHARAY

एक अशी वेळ,ज्या ज्या लोकांकडुन तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतभेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता "तुझा सुड घेण्याइतकी तुझी पात्रता (लायकी) नाही" अस म्हणुन त्यांना सोडुन द्यायची.अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा.

एक वाट धरावी, एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं.नव्या माणसांना भेटत राहावं. त्यांच्याकडुन जे चांगलं ते घ्यावं. भावनांमधे न अडकता पुढे जात राहावं. आपली कदर कोणाला आहे-नाही ह्याच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं.ज्यांना तुमचं रडणं ऐकु नाही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील. ज्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील. आणि तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेलं.

त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःच अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेऊच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते अस निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील..!तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे राडा होईल.

सदस्य नोंदणीसाठी संपर्क : ९९८७४९६१३६
आश्रय महिला संस्था, अध्यक्षा : सौ.सिमाताई वखरे , कल्याण sanklit