CRIME BORDER | 26 December | 11:59 AM
बुलढाणा :शासकीय कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा- छत्रपती शिवाजी विद्यालय सिंदखेड लपालीचे यश- दोन शिक्षकांची विभागीय स्तरावर निवड : राज्य शासनाच्या वतीने यावर्षीपासून शिक्षण विभागातील डायट, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित शाळा आणि जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून आपापल्या जिल्ह्यात विजयी झालेल्या स्पर्धकांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.
या शासकीय कर्मचाऱ्यांच्यास्पर्धा मध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय सिंदखेड लपाली च्या श्री.सर्जेराव देशमुख यांची वादविवाद स्पर्धेसाठी आणि श्री.अविनाश पाटील यांची वक्तृत्व स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड झाली आहे. विभागीय स्पर्धा वाशिम येथे शिवाजी डीएड कॉलेज वाशिम या ठिकाणी होणार आहे.