CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पडघ्यातील किशोर माने मंत्रालयात उपसहाय्यक अधिकारी

CRIME BORDER | 27 December 2025 | 08:01 PM

पडघ्यातील किशोर माने मंत्रालयात उपसहाय्यक अधिकारी

ठाणे : भिवंडी तालुक्यातील  पडघा, बाळाजीनगर येथील  किशोर माने  MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन मंत्रालयात उपसहाय्यक अधिकारी म्हणुन त्यांची  नियुक्ती झाली आहे.  पडघा विभागातून   प्रथमच MPSC परीक्षा उत्तीर्ण केल्याचा बहुमान शिक्षक  कुटुंबातील  किशोर विलास माने यांना मिळाला आहे.  बी.एस.सी.,पी.यू.डी., एम. एस. सी., एम. ए.,एल. एल. बी.असे शिक्षण प्राप्त केले असून  अभ्यासात अत्यंत मेहनत घेऊन किशोर माने यांनी  हे यश प्राप्त केले आहे .  MPSC उत्तीर्ण व्हायची ही त्यांची जिद्द गेल्या पाच वर्षापासून होती आणि ती जिद्द कठोर परीश्रमाने आज किशोर माने यांनी  खरी करून दाखवली आहे. म्हणून  पडघा विभागातून व विविध विभागातून   किशोर माने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

काही दिवस  किशोर माने कंपनी मध्ये काम करीत होते . काम करत असतांनाच एका बाजूला  गेल्या ५ वर्षापासून त्यांचा अभ्यास सुरू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरीत होवून, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर होता. आपले प्रामाणिक प्रयत्न असतील तर थोडं उशिरा  पण  आपण आपले स्वप्न साकार करू शकतो. असे मत किशोर माने यांनी व्यक्त केले.