CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

अंतरीचे बोल -खाकी वर्दीतले देवदूत हो देवदूतच

CRIME BORDER | 27 December | 02:35 PM

खाकी वर्दीतले देवदूत हो देवदूतच म्हणायला पाहिजे कारण स्वतःच्या घरादाराचा ,मुलाबाळांचा विचार न करता स्वतःला कोरोना ची लागण होईल याची जराही चिंता न करता दिवसाचे चोवीस तास शिफ्ट प्रमाणे काम करतात ते पोलीस खरंतर देवदूतच,कोरोना ने संपूर्ण जगाला हैराण केले आहे,मृत्यूचे तांडव सुरू आहे,हजारोंच्या घरात माणसे मरत आहेत अशा वेळेला जगामध्ये मृत्यूचे तांडव सुरू असताना आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःचे शीर तळहातावर घेऊन लढत आहेत येथे,शूर सैनिक बनून...आधी लगीन कोरोनाचं .....म्हणत म्हणत स्वतःचा जीव धोक्यात घालून भारतीय जनतेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत,त्यांनाही त्यांचे घर,संसार आहेच की त्यांचीही मूळेबाळे आहेत,त्यांनाही त्यांच्या घरात बंदिस्त राहता आलं असतं...८ तासाची सेवा करता आली असती पण नाही ड्युटीवर जॉईन होताना घेतलेली शपथ,कर्तव्य प्रथम हे सगळ्यात महत्वाचं मग संकटं कोणतीही असो एकादा अपघात,एखादा मोर्चा किंवा काही असो,अगदी ऊन ,वारा ,पावसाची तमा न करता स्वतःच कर्तव्य चोख बजावत असतात, कशाची तमा नसते आपण सारे सण आणि उत्सव साजरे करत असतो ,घरामध्ये मौजमजा करत असतो, सणाचा आनंद लुटत असतो त्याचवेळी हे पोलीस भाऊ चौकाचौकात उभे राहून सुरक्षा रक्षकाचे काम करत असतात चौकाचौकात पहारा करत असतात, रस्त्यावरच्या वाहनांची काळजी घेत असतात खरंच त्यांच्या कार्याला सलाम आता तर कोरोना चा प्रादुर्भाव इतका वाढलेला आहे.

त्यामुळे जिथेजिथे हॉटस्पॉट आहेत जिथे जिथे कोरोनाची शक्यता आहे, रुग्ण आहेत,इमारती सीलबंद झालेली आहेत तिथे पोलिसांचा कडाक पहारा आहे ,मग धारावी सारखी वस्ती असेल ,मुंबईतले काही ठिकाणे असतील ,पुणे शहर असेल ,मालेगाव वाशिम आणि संपूर्ण देशातील जिथे-जिथे संचारबंदी आहे तिथे पोलिसांची गस्त अहोरात्र सुरू आहे, घरामध्ये राहा ,बाहेर पडून कोरोनाला निमंत्रण देऊ नका, घरातच राहा, सुरक्षित राहा, घरात थांबा, कोरोनाला परत पाठवा असं कितीतरी वेळा ते लोकांना ओरडून सांगत आहेत, तरीही लोक भाजी आणण्यासाठी, दू दूध आणण्यासाठी, औषध आणण्यासाठी,किराणा आणण्यासाठी गर्दी करतात, लोकांना गांभीर्य नाहीच का आणि मग सांगून सांगून कंटाळलेल्या पोलीसाना कडक नियमांचे पालन करावे लागते , कधीकधी एक दोन फटके द्यावे लागतात गरजेचे आहे ते कारण या रोगापासून संरक्षण करण्यासाठी घरात राहणे ,सामाजिक आंतर पाळणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि तेच आपल्या लोकांना कळत नाहीये अत्यावश्यक वस्तू ,भाजीपाला खरेदी करणं खरच गरजेचे आहे का? नाही राहू शकत का आपण काही दिवस भाजी शिवाय? पण नाही ....काही जण तर चक्क चौकात फेरी मारायला येतात ,काय बोलावं? या लोकांना ? कोरोनाचा भारतामध्ये वाढत असताना फैलाव या देशाची नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य नाहीच का? पोलिस कर्तव्य बजावत आहे.

रुटमार्च च्या माध्यमातून लोकांना जागृत करत आहेत, घराबाहेर पडू नका असं वारंवार सांगितले आहे ,काही ठिकाणी तर पोलिसांनी सेल्फी पॉइंट तयार केले आणि मी या शहराचा गुन्हेगार आहे असं त्या व्यक्तीने बोलायला लावलं आहे, पोलिस व्हॅनमधून दवंडी पिठवली आहे कि घरात रहा सुरक्षित रहा, किती सांगायचं? किती पोटतिडकीने ते सांगतात तरीही आपण मात्र आपलच खरं करतोय , रात्रीचा दिवस करून ते आपले कर्तव्य निभावत आहेत ,अगदी रस्त्यावर ही चौकी पहारा देत आहे अजून किती काय करावयाचे आहे? इतकं करूनही त्यांना दोषी ठरवले जाते,त्यांच्यावर दगडफेक केली जाते? का ते आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्था पाळण्याचा लोकांना आग्रह करतात म्हणून...

खरंतर असे गावागावात ते खडा पहारा देत आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत याची जाणीव ठेवा आणि प्रत्येकाने ठेवली पाहिजे, हे काम करत असताना जवळजवळ साठ जणांना पोलिसांनी कोरोना ची बाधा झाली आहे, दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाधा झालीये, का घालतात ते आपला जीव धोक्यात? कधी कधी त्यांना त्यांची लहान मुलं बाबा कामाला जाऊ नका असा हट्ट करतात,अगदी महिला पोलिसही आपल्या तान्ह्या बाळांना घरात ठेवून देश सेवा बजावत आहेत काहीजणी तर कामवाली बाई येत नाही म्हणून या मुलांना ऑफिसमध्ये आणून सांभाळत आहेत, तेवढा आपल्यासाठी त्यांचा फार मोलाचा वाटा आहे, त्यांचं कार्य मोलाचं आहे, आपल्याला फार काही करता आलं नाही तरी कमीत कमी आपण त्यांना सहकार्य करू शकतो,आपण घरात स्वतःला बंदिस्त करत घेऊन त्यांचा कार्यभार थोडा हलका करू शकतो आणि हे आपलं कर्तव्यच आहे ,या देशाचे आपण नागरिक म्हणून आपले काहीतरी कर्तव्य आहे ना! इथे कधी काय होईल याची शाश्वती नाही किती जरी मृत्यू झालेले आहेत.

परदेशातील परिस्थिती पाहिली तर अंगावर काटा उभा राहतो, प्रेतांच्या राशीच्या राशी पडलेत ,मरण पावलेल्या लोकांना मिलिटरी गाड्या अक्षरशा कोंबून नेतायेत आणि राशीवर टाकत आहेत इतकं भयानक मरण कधीच नसावं अगदी प्रेताला हात लावायलाही कोणी तयार होत नाहीत ही परिस्थिती आहे अशा वेळेला कोरोना आपल्यापासून लांब राहावा म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि ते प्रयत्नही पोलीस दादा करत आहे लोकांना वारंवार सांगत आहेत मग आपण सहकार्य करायला पाहिजे ना ही वेळही निघून जाईल पण त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे खरंतर कोरोना हे जैविक अस्त्र आहे आणि त्या अस्त्रचा नायनाट कसा होईल ते पोलिस पाहात आहेत, फार मोठे कार्य पोलिस करत आहेत लोकांना समजावून कोरोना चे संकट त्यापासून बचाव कार्य करताहेत, डॉक्टर सफाई कामगार हे आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत , त्यांना समजून घेऊया त्यांना सहकार्य करूया कारण या देशाचे नागरिक आहोत आपण ,आपलं कर्तव्य्करुया आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे.

आज जर पोलीस दादा नसते तर गावची सीमा ओलांडून कोरो णा कधीचा हाताला असता आणि तो आपल्या घरात यायला वेळ लागला नसता कारण आपण कितीही समजूतदार असलो तरी समजूतदारपणा आपल्याला दाखवता येत नाही हे सिद्ध केलेय या कोरोना ने आणि म्हणूनच तर भाजी मार्केटमध्ये किराणा सामान यांच्या दुकानासमोर प्रचंड गर्दी पाहायला मिळते, कोणतेही सामाजिक अंतर न राखता, पोलिसा अशा गर्दीत लोकाना आवाहन करत आहेत गर्दीत घुसुन... खरंच अशा पोलिसना प्रोत्साहनपर भत्ता दिला गेलाच पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे कारण घरात थांबून सुरक्षित राहणे आणि मैदानात लढणे यात फार फरक असतो,आज पोलीस तेच करत आहे आपलं कर्तव्य बजावत आहेत...अगदी सकाळी मॉर्निंग वॉक ला जाणार्या लोकाना अडवून त्यांच्या कडून शिक्षा म्हणून शारिरीक कवायती करुन घेत आहेत,घराघरात सामान पोचवत आहेत..कधी कधी खर्चासाठी गरजू ना पैसे देत आहेत..माणुसकी जपत आहेत...पोलिस हा माणसाच असतो,त्यालाही भावना असतात..हे सिद्ध केले आहे.अशा सर्व पोलिस कर्मचारी वर्गाला त्रिवार वंदन !

-डॉ.शीतल शिवराज मालूसरे