CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

जिवंत रहाण्यासाठी काँग्रेस पक्षाने धोरण आणि निती बदलणे आवश्यक

CRIME BORDER | 27 December | 02:35 PM

काश्मीर मधील ३७० कलम हटविण्याचे राष्ट्रीय देशभक्तीचे आणि देश एकसंघ राखण्यासाठीचे उचललेले पाऊल,तीन तलाक पद्धतीच्या सामाजिक सुधारणांचा संदर्भाने घेतलेला निर्णय,बालाकोटवर हल्ला करून पाकिस्तानला दिलेले उत्तर आणि जरी सुप्रीम कोर्टाचे निर्णयाने राममंदीराचा मार्ग मोकळा झालेला असला तरी विरोधात असल्यापासून सत्तेत आल्यानंतर सुद्धा राममंदीर निर्माणासाठी उचललेली पावले आणि ठाम निर्धार, यामुळे मोदी सरकारच्या नावाने पर्यायाने भाजपची प्रतिमा देशभरातच नव्हे तर परदेशातील भारतीयांमध्ये सुद्धा मोठ्या अभिमानाची,गर्वाची आणि घराघरात प्रत्येक जनमाणसांमध्ये स्वाभिमानाची व अत्यंत उत्साह आणि प्रेरणादायक शक्तीची मानसिकता निर्माण होऊन काँग्रेस पक्षाचे प्रती जनमाणसांत स्पष्टपणे घृणा निर्माण झाल्याचे चित्र आणि वास्तवता देशभरात पहावयास मिळत आहे.

काँग्रेस पक्ष कधीच नव्हता एवढा दुबळा,अशक्त,नेतृत्वहीन तर झालेला आहेच मात्र काँग्रेस पक्षाबाबतची विश्वसनियता आणि सहानुभूतीची भावना सुद्धा संपलेली दिसत आहे. गांधी नेहरूंची काँग्रेस आणि त्यांच्याच वारसांच्या नेतृत्वाखालील आत्ताची काँग्रेस यामध्ये खुप मोठा फरक आणि अंतर पडलेले असून काँग्रेसशिवाय देश नव्हता आणि आता देशात कॉंग्रेसची बीजे सुद्धा दिसत नाहीत.जी बीजे स्वरूप काँग्रेस आपण पहातो आहोत ती कुजलेली,सडलेली आणि वाळवी लागलेली बिजे असल्याने काँग्रेस गवत आता नष्ट होण्याच्याच मार्गावर दिसत आहे.कदाचित काळाने काँग्रेस पक्षावर उगारलेला हा आसुड असेल.यालाच काळाचा महिमा म्हणतात. कालाय तस्मै नमः भारत हा ८० टक्के हिंदूंचा देश आहे.आणि या ८० टक्के हिंदूंना हिंदूस्तानाशिवाय अन्य कोणताही देश अगर राष्ट्र रहाण्यासाठी नाही. उरलेल्या २० टक्केच्या संख्येत मुस्लिम,ख्रिश्‍चन अन्य धर्मीय आहेत.आणि त्या २० टक्केच्या लोकांना रहाण्यासाठी जगात असंख्य देश,राष्ट्रे आहेत ही वास्तवता आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसने केलेल्या कार्याला तोड नाही, स्वातंत्र्य प्राप्तीमुळेच कॉंग्रेसने स्वातंत्र्यानंतर सुमारे काही अपवाद वगळता ६० वर्षे एकहाती सत्ता उपभोगलेली आहे.मात्र नंतर सत्तालोलुपतेमुळे अहंकारी आणि स्वार्थी व व्यक्तीकेंद्रीत वंशपरंपरेच्या मोहापाईच सरदार वल्लभभाई पटेल,मोरारजी देसाई,जयप्रकाश नारायण स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा टिळक,सुभाषचंद्र बोस यासारख्या राष्ट्र भक्तांना कॉंग्रेसच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली.तरीसुद्धा काँग्रेस नावाचा पक्षाला जनमाणसातून कमी होऊ दिले नाही.

काँग्रेस पक्षाचे नावाने दगड सुद्धा पाण्यावर तरुन गेला असा तो काळ आता लुप्त होऊन या जहाजाला लहान छिद्रच नव्हे तर मोठे खड्डेच भगदाड रूपाने ठिकठिकाणी पडलेले असल्याने कोणत्याही दगडाचे वजनाशिवायच ती नौका आपोआपच स्वाबळानेच बुडत जात आहे.या पतनक्रियेचा मुख्य गाभा म्हणजे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमध्ये सामुहिक नेतृत्व बहरु दिले गेले नाही आणि व्यक्तिकेंद्रीतच घराणेशाहीची वंशपरंपरा स्वीकारल्यामुळे राष्ट्रीय पक्ष असूनही दात नखे नसलेल्या कागदी वाघाप्रमाणे या पक्षाची स्थिती झाली आणि अशा स्थितीला सुद्धा स्वार्थी आणि हुजरेगिरीला जी हुजुर म्हणणारेच आधुनिक काँग्रेसजन व नेते आहेत.विद्यमान काळात सुद्धा कॉंग्रेसमध्ये दूरदृष्टी असलेले दमदार, अभ्यासू ,आक्रमक,प्रामाणिक,ध्येय निष्ठा जपणारे नेते राहिलेले नसून सर्वत्र खुजे,मुर्ख,अनाकलणिय, पी हळद हो गोरी प्रवृतीचे चमकोगिरी आणि चमचागिरी करणाऱ्यांची व्यक्तिकेंद्रित फौज असल्याने आणि बैल गाभण नववा महिना बोलणारे व समजणारेच तसेच कट्टर जातीयवादी आणि धर्मांध प्रवृत्तीची उग्रवाद्यांची टोळीच सर्वत्र दिसत असल्याने काँग्रेस सावरण्याऐवजी नित्यक्रमाने रसातळाला जाणारा पक्ष ठरू लागला आहे.काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्ष त्या- त्या भागात परिस्थितीनुरूप ताकदवान दिसू व ठरू लागलेला आहे.मात्र काँग्रेस आता *"हातचा"* म्हणून बेरीज करण्यापुरता पक्ष उरलेला दिसत आहे.काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात सातत्याने हिंदुस्थानातील हिंदूंचे महत्त्व,हक्क-अधिकार समजून घेतले नाहीत,स्वीकारले नाहीत आणि ८० टक्के हिंदूंच्या भावना पायदळी तुडवून, २० टक्के अन्य धर्मांध मुस्लिम,ख्रिश्चन यांच्यासाठीच संपूर्ण देशाचा कारभार,कायदे,संरक्षण आणि असमान निती वापरल्यामुळे पूर्वाकालीन सहिष्णू व सहनशील असलेल्या भारतामध्ये आता समान आक्रमकता,धर्मांधता आणि जातीयवादाचा सामना सर्वत्र समोरासमोर पहावयास मिळत आहे.देशातील २० टक्के मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना काँग्रेसच्या काळात व्यवस्थित आणि पूर्ण संरक्षण मिळत होते म्हणून यांच्या मतांचा एकत्रित गठ्ठा आणि हिंदू मतांमध्ये फुट पाडून सत्ता पैशांचे बळावर मोल करून "फुट डालो राज करो" या नितीच्या वापराने काँग्रेसने ब्रिटिश नितीने राज्य केले.मात्र आता हाच प्रयोग त्यांच्या शवपेटीला ठोकलेला खिळा ठरत आहे.कारण आता ८० टक्के हिंदू हे संघटीतच नव्हे तर जागृत सुध्धा झालेले आहेत.

काश्मीरमधून हिंदू पंडितांची अन्यायकारकपणेच नव्हे तर भारत-पाक वाटणी सदृश्य परीस्थितीजन्य स्थिती बनवून केलेली हकालपट्टी काँग्रेसने उघड्या डोळ्याने पाहण्याशिवाय काहीच केलेले नसल्याने, त्यांची ही मुकसंमतीच ठरली आणि काश्मीरला विशेष दर्जा आणि बहाल केलेले ३७० कलम हा तर राष्ट्रद्रोहाचाच प्रवृत्तीला दिलेला पाठिंबा होता.जो कालानुरूप या गोष्टी भारतवासीयांना समजून आणि उमजून आलेल्या आहेत आणि भारतातच जर हिंदूंच्या देवदेवतांच्या मंदीरांना बांधण्यास अगर सण-उत्सव साजरे करण्यास बंदी आणि नियम असतील इतकेच काय राम जन्मभूमी आणि कृष्ण जन्मभूमी संदर्भाने वाद असतील अगर काशी विश्वेश्वरांचे मंदीरासमोर,अवतीभोवती परधर्मियांचे अतिक्रमण आणि आक्रमण असेल, कलकत्ता येथील माता महाकालीच्या उत्सवावर निर्बंध आणि अंकुश असेल वर्षानुवर्षे हिंदू धर्मियांचा भावना, श्रद्धा,परंपरा दडपून अन्य धर्मियांच्या कालबाह्य आणि बुरसटलेल्या धार्मिक भावनांचा उदोउदो करण्यांत काँग्रेसी राजसत्ता जर असमान पद्धतीने तोलमोल करीत असेल तर हा भडका होणे स्वाभाविकच होते व आहे.यामुळे नास्तिक हिंदू सुद्धा आस्तिक होऊन गेला.सहनशील आणि सहिष्णू हिंदू आक्रमक आणि जशास तसे उत्तर देण्यासाठीची मानसिकता त्याने तयार करून घेतली. काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यामुळे त्यांचेत समानतेची आणि राष्ट्रभक्तीची तीव्र भावना मनामनात प्रफुल्लीत होऊन रुजून गेली.राम मंदीराच्या बांधकामाच्या पायाभरणीतून रामजन्म आणि राम अवतार पूर्ण झाल्याचा सुखद आनंदाचा डोहातून तो आता कृष्ण अवताराचे डोहाळे पाहू लागला आहे.आणि लवकरच मथुरेच्या कृष्ण मंदीराचे कुलूप उघडण्याची मागणीच नव्हे तर ते तोडून फेकण्याचीच शक्ती निर्मितीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे.आणि यामधूनच आपोआपच काशी विश्वेश्वरांचे पूर्ण रूपाचे पूर्ण दर्शन घडविण्यासाठी "त्रिनेत्र" उघडे होऊन ही भारतभूमी विश्वविजेती जग्माता बनून हा देश धार्मिक, आर्थिक, ज्ञानाचे क्षेत्रात आणि सहिष्णू,संस्कारीत आणि बलशाली बनून जगद्गुरु म्हणून खऱ्या रामराज्याची जगभर सावलीचा प्रचंड कल्पवृक्षाची आशावादी दृष्टिकोन आणि भावना आता हळूहळू हिंदूंच्या उदरात जन्म घेऊन पावलेल्या आहेत. अर्जुनाला माशाचा फक्त डोळाच दिसत होता त्याप्रमाणे सहिष्णू हिंदू आणि नास्तिक हिंदू सुद्धा आता धार्मिक बनून त्या अनुषंगानेच तो वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करीत आहे.नोटबंदीमुळे काळा पैसा उघडकीस आला नाही,परकीय देशातून सुद्धा काळा पैसा देशात आला नाही.सामान्य,गरीबांनाच रांगेत उभे राहून अनेकांना मृत्यू पत्करावा लागला.

यामुळे श्रीमंतांवर आणि भ्रष्टाचाऱ्यांवर काहीच परिणाम झाला नाही.उलट २००० रुपयांच्या नोटांच्या जन्मामुळे भ्रष्टाचार्‍यांना सुगीचे दिवस आले.कोरोना हा जिवाणू नसलेला विषाणू रूपातील संसर्गजन्य महामारीचा रूपातील षडयंत्ररचित, चीनमधून जन्माला आलेल्या रोगाने जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा खिळखिळा करून,भयभीत करून जगाला हादरवून टाकले.त्यात भारताचे दृष्टीने विचार केला तर देशात यामुळे जणू एक प्रकारची वेगळ्याच स्वरूपातली आणिबाणी होती असाच अनुभव देशवासिय घेत आहेत. लोकशाहीच्या आवरणाखाली अधिकाऱ्यांचीच अधिकारशाहीमुळे देशातील करोडो लोकांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक,मानसिक, शारीरिक त्रास आणि वेदना सहन कराव्या लागलेल्या आहेत हे सत्य नाकारून चालणार नाही. राज्यकर्त्यांना सुद्धा हा त्रास आणि वेदना समजू अगर दिसू शकलेल्या नाहीत.अगर राज्यकर्त्यांनी सुद्धा ''कोरोना''चे नावाखाली आपले उखळ पांढरे करून घेतलेले आहे असे आरोप भविष्यांत होऊ शकतील आणि हे आरोप अजिबात निराधार नसून मोठ्या प्रमाणावर सत्य सुद्धा आहे.हे कालानुरूप पुढे येईलच.135 कोटी लोकांना घरांतच बसा असा संदेश होता.तर ते 135 कोटी जीव घरातच बसून जिवंत राहू शकतील अशी योजना कार्यान्वित करणे गरजेचे आणि आवश्यक असताना तसे केलेले नाही.निवडणुकांच्या काळात घराघरांत काळया कामाईचा पैसा, मतदानाच्या स्लीपा आणि दारूच्या बाटल्या अगर साडीचोळी घराघरांतील मतदारांचा शोध घेऊन व्यवस्थित पोहोचविणाऱ्या पुढाऱ्यांना घरोघरी दूध,भाजीपाला,किराणा,औषधी पोहोचविण्याची अगर दवाखान्यापावेतो आजारी माणसांना घेऊन जाण्याची अगर एका गावांहून अगर राज्यातून दुसऱ्या गावी अगर राज्यांत पोहोचविण्याची अत्यंत सुयोग्य सुंदर आखणी करून व्यवस्था करता येणे सहज साध्य करता येणार असतांना आणि सर्व शहरातील, खेड्यातील, गल्लीगल्लीत स्वच्छता मोहिमेतून सॅनिटाईझर करून कोरोना मुक्त करता आला असता तसेच देशातील सर्व भागातील सरकारी नोकरवर्गाची 1 वर्षासाठी 50 टक्के पगार,भत्ते कपात करून आणि सर्व राज्यातील आमदार,खासदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील पुढाऱ्यांचे २ वर्षाचे वेतन,भत्ते शासकीय तिजोरीत जमा करण्याचा अध्यादेश काढून "रामाचा आदर्श" डोळ्यासमोर ठेवून कृती केली अगर झाली असती तर "कोरोना" हा रोग नसून "षडयंत्र" आहे असा आरोप करण्याची हिंमत झाली नसती.मात्र या कोरोनाचे काळात श्रीमंतांचे आणि सरकारी अधिकारी व पुढाऱ्यांचे काहीही आणि कोणत्याच प्रकारचे नुकसान झालेले नसून यामध्ये सर्वात गरीब असलेल्यांनाच शेकडो,हजारो मैल पायी चालण्याची,लहान बालकांना आणि गर्भवती महिलांना सुद्धा हाल-अपेष्टा सहन करण्याची आणि भुकबळीने मरण यातना झेलण्याची हजारो घटना आज उजेडात आलेल्या दिसत नसल्या तरी तसेच मध्यमवर्गीय माणूस हा एका तपाने म्हणजे 14 वर्षे मागे गेलेला असून त्याचे आर्थिक गणित संपूर्णपणे कोलमडून पडले आहे.हजारो मध्यमवर्गीयांना दुकानाचे भाडे,घराचे भाडे मिळाले नाही तर भाडेपट्ट्याने घरात राहणार्‍यांना घरे सोडावी लागली व भाडेपट्ट्याने दुकाना चालविणाऱ्यांना दुकाने सोडून द्यावी लागली.

मध्यमवर्गच मध्यमवर्गीयांचा शत्रू बनून दोघांनी आपआपसात आर्थिक कारणांनी भांडून दोघांनाही संपवून घेतले. कंपन्यांच्या उद्योगधंद्यांचे दिवाळे निघाल्याने करोडोंच्या नोकऱ्या आणि रोजगार बुडाला.जगाचा पोशिंदा शेतकऱ्याने या काळात १३५ कोटी जनतेला जगविले.मात्र तो आहे तेथेच राहिला.सॅनिटाईझर,मास्क,साबण वाल्यांनी बसल्या-बसल्या नोटा छापून घेतल्या.देवदूत आणि कोरोना योद्धांचे नावाखाली आरत्या ओवाळून घेणाऱ्यांनी जनतेची खुप छळवणूक केलेली आहे.काही ठिकाणी तर किडनी चोरीच्या असंख्य घटना उघडकीस आलेल्या आहेत.हजारो वर्षात असा लॉकडाउन पाहिला अगर अनुभवलेला नाही मात्र अशाही भयावह आणि भितीयुक्त वातावरणात देशाला जावे लागत असतांना देशभरातील एकाही पुढार्‍याने, आमदार,खासदार,मंत्र्यांने आणि तलाठी,मामलेदार,कलेक्टर,पोलीस,फोजदार, आय.जी.,डी.आय.जी. तत्सम अधिकाऱ्यांनी कोणीही आपला पगार,भत्ते,पेन्शन यामध्ये कपात केली नाही.दोन वर्षाचे मानधन पगार भत्ते याचा त्याग केला नाही.उलट मेलेल्या व्यक्तींच्या टाळूवरचे लोणीच चाटण्याची प्रवृत्ती ठेवून "कोरोनाचा" एक चांगला धंदा आणि चालून आलेली संधी समजून देशातील जनतेला लुटण्यांत आलेले आहे.याचा पंचनामा भविष्यात जगासमोर येईलच.अशा पद्धतीची माणूसकीहीन वागणूकीत असंख्य धार्मिक आणि सेवाभावी संस्थांनी अन्नदानाची भोजनगृहे निर्माण करून भंडाऱ्याचा रुपाने सामाजिक बांधिलकी जपलेली आहे म्हणूनच "भारत देश महान आहे". मात्र देशातील पुढारी, अधिकारी, श्रीमंत, अभिनेते हे खुजे आहेत,संधीसाधू , भ्रष्ट आणि स्वार्थी असून मोठे दहशतवादी कलाकार आहेत,हे सुद्धा काळाने पाहिले व अनुभवलेले आहे. "नरेंद्र मोदी है तो मुमकिन है" हे जरी सत्य असले तरी ते अर्धसत्य आहे कारण भ्रष्टाचार हा संपलेला नसून तो अधिकने वाढलेला आहे.गावागावांतील पोलीस आणि तलाठी हा पैसे न घेता न्यायप्रमाणित वागून सेवा करेल.मामलेदार,कलेक्टर, डी.एसपी.यांना जिल्ह्यांतील कार्यक्षेत्रातील जनतेचे दुःख समस्या समजत आहेत आणि त्याचे न्यायप्रणित सोडवणुक होत आहे असा "सुदिन" येण्यासाठी अयोध्येचा राम नव्याने पुन्हा जन्माला यावा लागेल.असे जरी असले तरी विद्यमान मोदी सरकार शिवाय दुसरा पर्याय तर नाहीच नाही मात्र हिंदूचे अस्तित्व म्हणून मोदी सरकार आणि भाजप ह्या उदात्त हेतूच्या विचारांमुळेच बेरोजगारी,महागाई ढासळलेली अर्थव्यवस्था,कोरोना काळातील झालेला मानसिक,शारीरिक,आर्थिक त्रास,नोटबंदी,जी.एस.टी. सर्व प्रकारचे प्रश्न हे विरघळून वाहून जातात.आणि धर्म ही अफूची गोळी असली तरी धर्म रक्षति रक्षतः हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आणि आवश्यक आहे.धर्मासाठीच सारेकाही ह्या भावनेने हिंदू हा मोदी सरकार आणि भाजपला दूर सारू शकत नाही.

याला काँग्रेसचेच ६० वर्षाचे शासन,कारभार आणि निती कारणीभूत आहे.नाहीतरी आज काँग्रेस कोठे आहे.गावागावांतील, ठिकठिकाणचे काँग्रेसचे नेते भाजप मध्ये सामील झालेले आहेत.दारु तीच बाटली बदलली गेली आहे.जुनी भाजप सुद्धा राहिलेली नसून अटलजी युग संपलेले आहे आणि अडवाणी युगाचा समारोप होण्याच्या मार्गावर आहे."भाजप इज इक्वल टु काँग्रेस" भाजपचा स्थानिक कार्यकर्ता वर्षानुवर्षे उपाशी राहून ज्याच्या विरोधात लढला आज तोच विरोधक काँग्रेसवाला भाजपचा बडा नेता होऊन भाजपचे कार्यकर्ते त्याचे आदेश पाळत असून त्याचे नेतृत्वाखाली श्वास घेत आहेत. म्हणून हा राजकीय बदल नावापुरता मर्यादित आहे. काँग्रेस ऐवजी भाजपची सत्ता मात्र व्यक्तीबदल झालेला दिसून येत नाही.उद्या जर काँग्रेस सत्तेवर आली तर भाजपमधील सर्व काँग्रेसजन "घरवापसी" म्हणून काँग्रेसमध्ये आणि भाजपाचे सर्व जुने कार्यकर्ते मसणवटीत.भाजप पुन्हा गल्लीतून वन टू का फोर करीत राजकारणाचा हा "गोलमाल" खेळ घडवायचा असेल तर काँग्रेस पक्षाला धोरण आणि निती बदलणे आवश्यक राहणार आहे. काँग्रेसला जरी मुस्लिम विरोध करावयाचा नसेल तो करू सुद्धा नये तरी त्यांना मुस्लिमांचे तुष्टीकरण आणि झुकते माप देण्याचे पूर्णपणे सोडावे लागेल.मुस्लिमांना सुद्धा हिंदु विरोधाची भावना सोडून द्यावी लागेल. रामरहीम म्हणूनच त्यांनी सुद्धा हिंदू देवदेवतांना स्वीकारून बंधुभावाने पुजा अर्चेत सामील होऊन जिव्हाळा, एकोपा निर्माण करण्यासाठी सरसावले पाहिजे.कॉंग्रेसने आता "जय श्रीराम" नारा दिला पाहिजे. काशी मथुरेचा लढा काँग्रेसने मुस्लिमांचे मन वळवून अगर त्यांचे मताची पर्वा न करता सुरू केला पाहिजे.

हिंदू हित दुर्लक्ष न करता सर्वधर्म समभाव अंगीकारला पाहिजे. नेतृत्व,कर्तुत्व आणि अभ्यासू अगर दुरदृष्टीरहित झालेले प्रभावशून्य व्यक्तिमत्व राहुल गांधींना बाजूला सारून तसेच दिखावू आक्रमकता असलेल्या देखण्या स्त्रीत्वाची भूमिका बजाविणाऱ्या प्रियंका गांधी उर्फ वाड्रा यांचेशिवाय सामुहिक नेतृत्त्वाने सर्व प्रादेशीक नेत्यांना सामावून व समजून घेवून प्रामाणिक राष्ट्रीय नितीने कार्य करण्याचे धोरण आणि नितीचा काँग्रेसने स्वीकार केला तरच पुन्हा सत्ता प्राप्त करु शकतील आणि जिवंत रहातील.अन्यथा नोटबंदी, जीएसटी,कोरोना,भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून त्यांनी भाजपला कितीही घेरले.कानपूरवाला विकास दुबे प्रकरणांत षडयंत्ररचित एन्काऊंटर प्रकरण न्यायप्रणालीची हत्या करून केलेला आणि पोसलेला दहशतवाद जरी असला असे शेकडो प्रश्न जरी असले तरी ज्या प्रमाणे मुलगा कितीही बिघडलेला असला तरी मायबाप त्याला सोडून देत नाहीत उलट त्याच्याचसाठी कणकण झिजवून ठेवलेली माया वृद्धिंगत करून त्याला जोपासतात हे लक्षात घेऊन ८० टक्के हिंदू जनमत हे भाजपचा अस्वीकार करणार नाहीत.म्हणूनच भाजपला पर्याय निर्माण करावयाचा असेल तर हिंदू धर्मातील बुरसटलेल्या रुढी- परंपरांचा सुधारणेसाठी अवश्य पुढाकार घेऊन चळवळ निर्माण करावी.

आदिवासी,दलित मागासवर्गीयांना उदात्त आणि प्रामाणिक भावनेने त्यांच्या प्रगतीसाठी झटावे त्यांचा राजकीय वापर होता कामा नये.हिंदू धर्मातील जातीयता आणि विषमता नष्ट करण्यासाठी अवश्य प्रहार करावेत मात्र हिंदू देवदेवतांचा संदर्भाने अनादर न करता त्यांनी देवी देवतांचे बाबतीत पुजनीय वंदनीयच रहावे.कॉंग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणीकडे लक्ष न देता व्यक्ती केंद्रीत बांधणीमुळे व्यक्तींनाच मोठे केल्यामुळे कॉंग्रेस पक्षाचा ऱ्हास झालेला आहे.जय श्रीराम अवतारानंतर आता त्यांनी जय श्रीकृष्णचा नारा देत काशी विश्वेश्वरांचे नेत्र उघडण्यापुर्वीच जर "जय जवान जय किसान" यांचे साठीचे धोरण स्वीकारुन जनतेची बांधीलकी मान्य करून ऊभे रहाण्याचा प्रयत्न केला तरच ते तरू शकतील, कारण आता सामना बरोबरीचा आहे. म्हणून कॉंग्रेसने धोरण आणि निती बदलून हिंदू हित प्रथम आणि सर्वधर्मसमभावाची योग्य आणि प्रामाणिक व्याख्या स्विकारून सामुहिक नेतृत्व जोपासले तर आणि तरच ते पुर्नप्रस्थापित होऊ शकतील अन्यथा मरणासन्न झालेल्या अगर उखळीत डोके असलेल्या काँग्रेसने वेळेची प्रतिक्षा पहाणे उचित ठरणार नाही.

लक्ष्मण हिरालाल कदम,शहादा
मोबाईल:9422787500

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे: बातम्या लेख व जाहिरातीसाठी संपर्क - साधा - मोबा. ९६१९६३००३५ / ९९८७४९६१३६