CRIME BORDER | 27 December | 02:35 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क - राजेंद्र वखरे
डोंबिवली : विष्णुनगर पोलीस ठाणे डोंबिवली या ठिकाणी डिटेक्शनला कार्यरत असलेले पोलीस अधिकारी गणेश वडणे हे एक शिस्तप्रिय अधिकारी असून ते या ठिकाणी आल्यापासून त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा एक वचकच निर्माण केला आहे. एवढेच नव्हे तर खितपत पडलेले गुन्हे सुद्धा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उघड केले असून पोलीसा बद्दलचा आदर आत्मीयता व विश्वास वाढवण्यास गणेश वडणे कारणीभूत म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ते कितीही कामात असले तरी त्यांच्याकडे कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकास आवर्जून भेटतात त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतात व त्यांना अगदी समजेल उमजेल अशा भाषेत सांगून त्यांचा विश्वास द्विगुणीत करीत असतात.मग वेळ प्रसंगी ते खाकी वर्दीचा हिसकाही दाखवायला मागेपुढे बघत नाही. कारण सराईतांना खाकीचीच भाषा समजते. त्यांच्याशी बोलताना लक्षात येते की, अशा तरुण तडफदार व खाकीवर्दीशी इमाने इतबारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची खरच आपल्याला गरज आहे.
गणेश वडणे हे जसे नागरिकांसाठी तत्पर असतात तसेच वरिष्ठांचे आदेश हि ते तत्परतेने अमलात आणतात त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करणारे सहकारी यांच्या सोबतही ते तेवढ्याच आपुलकीने व कुटुंबाप्रमाणे वागतात जर आपण आपल्या सहकाऱ्या सोबत चांगल्या प्रकारे वागलो तर आपण योग्य पद्धतीने कार्य करू शकतो असे ते म्हणतात . त्यांच्या म्हणण्यानुसार नशिबानेच खाकीची वर्दी मिळत असते.
पोलीस हे गोरगरिबांच्या अन्याय पीडितांच्या साठी सरसावते पोलीस हा घटक सर्वात पुढे असतो कुठे चांगली घटना असो किंवा अत्यंत वाईट घटना असो सर्वात पुढे असतात ते पोलीस म्हणून खाकी वर्दीचा मान-सन्मान राखून प्रत्येकाने काम केल्यास समाज कंटकांचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही.
पोलीस खात्यातील महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचा प्रदीर्घ अनुभव असलेले शिस्तप्रिय/कणखर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे साहेब यांना ते गुरु मानतात व त्यांची प्रेरणा घेऊन हे मार्गक्रमण करीत आहेत.
तुम्ही आमच्यासाठी १२ महिने, २४ तास काम करताय जीवाचं रान करताय. आमच्या सुरक्षेसाठी स्वतःची सुरक्षा विसरून गेला आहात . कोरोना सारख्या गंभीर आजारालाहि तुम्ही न घाबरता त्याचा मुकाबला करताय ते प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा म्हणूनच. इतकंच काय तर स्वतःच घर विसरून तुम्ही इतरांच्या घरासाठी दिवसरात्र एक करताय. तुम्ही तुमच्या वर्दीसाठी सदैव तत्पर असता आणि म्हणूनच आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.
अशा या हरहुन्नरी काळ वेळ न पाहता खाण्या-पिण्याच्या वेळा न पाडता सदैव पोलीस खात्याची जुळुन कार्यमग्न असणाऱ्या पोलीस अधिकारी गणेश वडणे यांना क्राइम बॉर्डर परिवाराचा मनाचा मुजरा व त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!- Dt. 18/09/2021
मुख्य संपादक राजेंद्र वखरे
- मोबा.९६१९६३००३५ - डोंबिवली