CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

प्रासंगिक - म्हातारपणात जीवनाचा शेवट अशा भयानक परिस्थितीत होऊ शकतो ? - राजेंद्र वखरे

CRIME BORDER | 27 December 2025 | 08:05 PM

प्रासंगिक - म्हातारपणात जीवनाचा शेवट अशा भयानक परिस्थितीत होऊ शकतो ? - राजेंद्र वखरे

CRIME BORDER

डोंबिवली : निसर्ग नियमानुसार या भूतलावर जो कोणी मानव जन्माला येतो,तो आपल्या संस्कृती नुसार विवाह बंधनात अडकतो आणि मग वंश परंपरागत मुलांना जन्म देतो.हीच मात्रा या भूतलावरील सर्व सजीव प्राण्यांना आहे.परंतु मानवा पेक्षा जे काही जीव जंतू आहेत ते इमाने इतबारे आपल्या पासून उत्पन्न झालेल्या जीवांचा ते सांभाळ करतात व मोठे करतात.पुढे तेच जीव जंतू आपल्या आई वडिलांचे पालन करतात. आपल्या सर्वांना माहिती आहे कि, पक्षी सुद्धा वृद्ध झाल्यावर त्यांचे पिलंही अन्न शोधून त्यांच्या तोंडात चोची मध्ये टाकत असतात हे आपण बघितले आहे.

पण मानव म्हणून जन्माला आलेल्या पैकी काही चांगली आहेत.सुसंस्कृत आहेत ,परंतु आजही उसाच्या पोटी काळीज जन्मतात हेही तेवढेच खरे आहे. आपण जिच्या उदरातून जन्म घेतो त्या माय माऊलीला सुद्धा आपण विसरून जातो. आपले आई वडील आपल्याला लहानाचे मोठे करत असतांना रक्ताचं पाणी करुन आपल्याला मोठं करतात आणि एक सुज्ञ नागरिक बनवतात,परंतु जेव्हा हीच मुलं मोठी होतात.लग्न झाल्यानंतर तेच आपल्या आई-वडीलांना विसरून जातात,परंतु यातील काही मुलं मुलीही आपल्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून सांभाळ करतात पण काही महा नालायक अशी आहेत की ,आपल्या आई वडिलांच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्यांना गोड बोलून सर्व संपत्ती नावावर करून घेतात व त्यांना कुठेतरी लांब सोडून देतात दुसरी बाजू अशी की,नातेवाइकांमध्ये आपले नाव खराब होऊ नये म्हणून ते त्यांना दूर कुठेतरी जाऊन सोडून देतात मग अशा वृद्धांचा शेवट हा कायम अति खराब ठरलेला आहे.यातील काही वृद्ध हे त्यांच्या नशीबाने पुढे पोलीसांच्या हाती लागतात मग पोलीस त्यांना आश्रमात नेतात आणि तिथे त्यांना सुविधा मिळते.

परंतु आम्ही सामाजिक काम करत असतांना (एनजीओ) च्या माध्यमातून अनेक संस्थांना भेटी देतो तेव्हा आम्हांला काही गोष्टी बघायला मिळतात कि,शेवटच्या क्षणाला सुद्धा त्या वृद्ध आई वडिलांचे मुलं किंवा मुली नातलग त्यांना अग्निडाग द्यायला सुद्धा येत नाही.ओळखही दाखवत नाही मग अशा वेळेस सामाजिक संस्था त्यांचा अंतिम विधी करतात किंवा पोलीस अंतिम विधी करतात हि फार खेदजनक बाब आहे.

अशाच प्रकारची घटना डोंबिवली मध्ये उघडकीस आलेली आहे. दि.३० जुलै २०२१ रोजी एक वृद्ध आजोबा वय वर्ष ८५ ते ९० च्या आसपास असावे ते डोंबिवली मध्ये फिरत असतांना एका चांगल्या भल्या रिक्षावाल्याने त्यांची चौकशी केली असता त्यांना बोलता येत नव्हतं ते कुठे राहतात ? हे सांगता येत नव्हतं म्हणून त्या रिक्षावाल्याने त्या वृद्धास विष्णूनगर पोलीस ठाण्यामध्ये आणले आणि तो तपास मग एपीआय महेश जाधव यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी बरीच चौकशी केली त्या वृद्ध व्यक्तींकडे विचारणा करण्यात आली परंतु त्यांना काही बोलता येत नव्हतं,सांगता येत नव्हतं मग त्यांनी त्या अज्ञात वृद्ध आजोबांचा फोटो काढून व्हायरल केला समाज माध्यमांना पाठवला की, आमच्या हद्दीमध्ये एक वृद्ध आजोबा सापडले असून त्यांना काहीही सांगता येत नाही, हे ज्यांचे कुणाचे नातेवाईक असतील त्यांनी येऊन घेऊन जावे,परंतु कोणीही पुढे आले नाही.मग एपीआय महेश जाधव यांनी डोंबिवली पश्चिम येथील साधना वृद्ध सेवा केंद्र वृद्धाश्रमाच्या संचालिका सुमेधा थत्ते यांची भेट घेऊन वृद्ध आजोबानां त्यांच्या आश्रमामध्ये ठेवले. आश्रमातील संचालिका या सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने त्यांना ही बाब नवीन नव्हती,त्यांनी त्या वृद्धाचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली व आश्रमात वृद्ध आजोबांना ऍडमिट करून घेतले. त्यांनी त्या वृद्धांची सेवा इमानेइतबारे केली,परंतु या कालावधी मध्ये त्यांना शोधणारा कोणीही पुढे आला नाही. केंद्रामार्फत त्यांची सेवा करण्यात आली.

अशा या वृद्ध आजोबांची तब्येत बिघडली आणि साधना वृद्ध सेवा केंद्र वृद्धाश्रमाच्या संचालिका यांनी पोलीसांना कळवले कि आजोबांची तब्येत बरी नाही आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले पण या वृद्ध आजोबांची प्राण ज्योत ही दि.१९ सप्टेंबर २०२१ रोजी मालवली.

या आजोबांना कोणीतरी शेवटचा अग्निडाग द्यावा यासाठी एपीआय महेश जाधव यांनी पुन्हा एकदा प्रसिद्धी माध्यमांकडे व व्हाट्सअप ग्रुप द्वारा त्यांच्या निधनाची बातमी पाठवली.शेवटच्या क्षणी तरी त्यांच्या नातलगांनी पुढे यावं व त्यांच्यावर अंतिम संस्कार करावा असे आवाहन केले परंतु अजूनही या वृद्ध आजोबांना शोधत अग्निडाग देण्यासाठी कुणीच आलेले नाही.

समाज माध्यमावर आज व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडीया हे सर्व तात्काळ क्षणार्धात सर्व जगभर बातमी पसरवत असतात आणि आम्हाला खात्री आहे.शंभर टक्के या आजोबांच्या नातेवाईकापर्यंत बातमी गेली असावी परंतु ते का पूढे येत नाही? हा एक मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे.किंवा त्यांना माहीतच नसेल का ?

आम्ही तपास अधिकारी एपीआय महेश जाधव यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्याकडून माहिती घेतली असता ते म्हणाले की, आजोबांचे नातेवाईक अद्याप पर्यंत त्यांचा ताबा घेणे करीता पुढे न आल्याने शव बाई रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण पश्चिम येथे शवागृहात ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारच्या केसेस आमच्याकडे येतच असतात आणि आम्ही आमचं कर्तव्य म्हणून व पोलीसातील माणूस म्हणून त्यांचा शेवट करत असतो. जर या आजोबांच्या अग्नी संस्कार साठी कोणीही पुढे आले नाही तर आम्ही स्वतः त्यांचा अग्निसंस्कार करू किंवा यासाठी आम्ही कुठल्याही सामाजिक संस्थेची मदत घेऊन त्यांचा अंत्यविधी करू असे त्यांनी सांगितले.

विष्णूनगर पोलीस ठाण्याचे व.पो.नि.भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महेश जाधव मयत आजोबांच्या वारसाचा घेताहेत शोध.

आज सरकारच्या वृद्ध लोकांसाठी अनेक योजना आहेत पण त्या सर्व कागदावर आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. खरोखरच समाजाची मन इतकी बोथट झाली आहेत का ? की, ज्यांना आपले आई-वडील हे एक ओझं वाटतात जे आई-वडील त्यांच्यासाठी अहोरात्र काम करतात आणि शेवटच्या क्षणांमध्ये त्यांना मरण हि चांगले येऊ नये.आपल्या माणसांजवळ ते शेवटचा श्वास घेऊ नये काय म्हणावे अशा या दुर्दैवी क्षणाला.

सोबत जोडलेल्या फोटोतील वयोवृद्ध इसमांच्या नातेवाईकां पर्यंत सदरचा संदेश पोहचवावा जेणेकरून वयोवृद्ध इसमांचे अंतिम संस्कार त्याच्या नातेवाइकांना मार्फत होतील. नातेवाईक पुढे येत नसतील तर आजूबाजूच्या लोकांनी, गावातील लोकांनी ,समाजातील लोकांनी त्यांच्या नातेवाईकांचा पत्ता पोलीसांना कळवावा .त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. तरी सदर चा संदेश महाराष्ट्रातील सर्व व्हाट्सअप ग्रुप वर पाठवण्यात येऊन त्या मयत वयोवृद्ध इसमाच्या नातेवाईकांचा शोध घ्यावा असे आवाहन एपीआय महेश जाधव यांनी केले आहे .

अधिक माहितीसाठी विष्णुनगर पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक 0251 - 2480102 यावर माहिती कळवावी अथवा सपोनि महेश जाधव मोबाईल क्रमांक 8879782182 या वर संपर्क साधावा .

- राजेंद्र वखरे,- संस्थापक - क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन,(एनजीओ) डोंबिवली

MOB -9619630035