CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आणि बापानं गळफास घेतला.... -- पुनित खांडेकर

CRIME BORDER | 27 December 2025 | 08:05 PM

No image available

डोळ्याच्या पापणीचा थेंब देखील सुकला नव्हता आणि बाबांच्या फोनची रिंग वाजली , मी फोन उचलला आणि समोरून एक स्त्री बाबांच्या नावे बोलू लागली , मी त्यांच्या सोबत बोलू शकते का ? हा कॉल रेकॉर्ड होतोय वैगरे वैगरे . मी त्यावर काही न बोलता म्हटलं हो बोला कोण बोलतंय त्यावर सदर महिलेने त्यांचं नाव सांगितलं आणि म्हणाल्या मी बँकेतून बोलत आहे. त्यावर मी त्यांना प्रती वक्तव्य केले बोला काय झालं? त्यांनी शेतीच्या कर्जाचा उल्लेख केला आणि मी काही म्हणायच्या आताच कर्जाची रक्कम खात्यावर कधी जमा करणार असा खडा सवाल माझ्या कानी शिस्या सारखा उतरला.

काही क्षण मला सुचलेच नाही की, मी नक्की काय बोलावं. कंठ दाटून आला होता व्यक्त व्हावं तरी कसं ! मी त्या महिलेला ,बाबा नाहीत असं नम्र पणे सांगण्याचा प्रयत्न केला ,त्यावर त्या म्हणाल्या की , केंव्हा बोलनं होईल वैगरे पण दरम्यान मला लक्षात आले की , माझे बोलणे त्यांच्या लक्षात आलेले नाही म्हणून मी धाडस करून त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की, आज बाबांचं बारवं आहे.त्यावर त्या समोरील महिला एक क्षण शांत झाल्या. आणि म्हटल्या माफ करा. मी नंतर फोन करते. कदाचित त्या शांत झालेल्या क्षणात त्यांना समजलं असेल आभाळ उद्धवस्त होऊन सूर्याच्या तेजोमय किरणांनी आग ओकायला सुरवात केली आहे. जगण्यासाठी घेतलेले कर्ज मरणावर उठेल हे स्वप्नात पण नव्हतं. "मी गेलो तर निदान कर्ज माफ होईल; माझ्या कुटुंबाला होत असलेल्या त्रासातून मुक्ती मिळेल."अस काहीसं वाटून बापानं गळफास घेतला. वावरातील झाडाला बांधलेली दोरी आयुष्यची गाठ कधीही सोडू शकते इतकी ती दोरी वावरात खुपते. माणूस संपला म्हणजे त्याच्या प्रियजनांचे त्रास कमी होतील असे नाही बहुदा ते वाढतील आणि बोचू लागतील परिस्थिती सोबत असंख्य काट्यां प्रमाणे.-