CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यास पनवेल गुन्हेशाखा कक्ष - २ ने शिताफीने केले गजाआड - या गुन्ह्यात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता - वपोनि.गिरीधर गोरे

CRIME BORDER | 27 December | 02:45 PM

★★★ राजेंद्र वखरे ★★★★

पनवेल : आज-काल अनेकजणं कमी कालावधीत व कमी श्रमात बक्कळ पैसा कमविण्यासाठी धावपळ करतांना आढळतो. मग या साठी ते नितीमत्ता गहाण ठेवायलाही मागेपुढे पाहत नाही. त्यांचे ध्येय फक्त पैसा आणि पैसा कमावणे हेच असते. आपली पात्रता काय आहे. आपण काय करू शकतो याची त्यांना जाणीव असते पण तरीही ते नितिमत्ता सोडून पैशालाच देव मानून कुकर्म करतात.काही ठिकाणी तर झोपडपट्टी स्लम एरियात जनतेच्या आरोग्याशी बोगस डॉक्टर खेळ खेळतांना दिसतात.हे भामटे साळसूद पणे टीप-टॉप राहून डॉक्टर असल्याच्या आविर्भावात वावरतात. त्यांच्या राहणीमानावरुन हे खरंच खरच डॉक्टर आहेत असे लोकांना भासते.असे हे बोगस डॉक्टर स्लम एरिया मध्ये आपले दुकान थाटतात.आतातर कोरोना महामारीत हरामखोरीचा कळस गाठलेला दिसत आहे.आज संपूर्णजगावर साथीचे संकट ओढवले आहे. जगभर मृत्यूचे तांडव पहायला मिळत आहे.या रोगाने गरीब श्रीमंत असा भेदभाव केलेला दिसत नाही.या भूतलावर असलेली मानवजात परमेश्वराने निर्माण केल्याचा हा पुरावाच नव्हे का?

गेल्या काही दशकात पैशाच्या जोरावर मानवाने चंद्रावर जमीन विकत घेवून तिथे राहण्याचा घाट घातला असल्याचे आपण ऐकले व वाचले आहे. विज्ञान नवनवीन संशोधन करते. पण कोरोना विषाणूने सर्वांना जेरीस आणले आहे.जो-तो आपापला जीव वाचविण्यासाठी घरात बसण्याचा प्रयत्न करीत आहे.कोरोना महामारीच्या या दुसऱ्या लाटेत अनेक संकट ओढावले आहेत.गोर गरीबांचे हाल होतांना दिसत आहेत.शासन आपापल्या परीने मदत करीत आहेत.अनेक संस्था दानशूर व्यक्ती, कोरोना योद्धे जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.

आरोग्य यंत्रणेवर फार मोठा ताण आला असून दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून अनेक नैसर्गिक संकटेही येत आहेत . हॉस्पीटलमध्ये आग लागणे, ऑक्सिजनची कमतरता भासणे, बेड न मिळणे या सर्व परीस्थितीने मानव हतबल झाला आहे. अनेक डॉक्टर, परिचारीका, वॉर्ड बॉय, पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून मानवतेचे दर्शन देत असतांनाच मूठभर नालायक मानवतेला काळीमा फासतांना दिसतात.काही दानशूर समाजकार्य करतांना कुठलाही स्वार्थ ठेवत नाही पण याचाच काही गैरफायदा घेणारेही आहेत.

अलीकडे रेमडेसिवीर हे कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे औषध संजीवनीसारखे काम करीत आहे. पण रुग्ण संख्या वाढल्याने रेमडेसिवीर उत्पादन कंपन्यावर त्याचा ताण येत असल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे हे इंजेक्शन तीन हजारापासून ते दिड लाखपर्यंत गरजूंनी घेतल्याचेही आपण वृत्तपत्रात व चर्चेतून ऐकतो आहे. दुर्दैव म्हणजे रुग्णांच्या जीवाशी संबंधित खेळत आहेत. यात काही डॉक्टर, परिचारीका, वॉर्डबॉय शामिल आहेत.परंतु जसे डॉक्टर देवदूताचे काम करतांना दिसतो त्याच पद्धतीने पोलीसही देवदूताचे काम करीत आहे.

त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत.जेव्हा पोलीसांच्या असे लक्षात आले की, रेमडेसिवीरचा काळा बाजार होत आहे. तेव्हा त्यांनी खबऱ्यांमार्फत टिम विभागून आपापल्या विभागात लक्ष केंद्रीत केले. निर्लज्जम् सदा सुखी आपल्या देशातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्याचबरोबर गरीबी ही वाढत जे मिळेल ते काम करून लोकं आपला जीवन चरितार्थ चालवतांना दिसतात. मुंबई मध्ये तर अनेक प्रकारचे धंदे चालतात. प्रत्येकजण पोलीस खात्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असतो पण हा देश माझा आहे मी या देशाचं काहीतरी देणं लागतो हे ते सोयस्करपणे विसरतात. परंतु आजही पोलीस खाते कार्यरत असल्यामुळे गुन्ह्याला आळा बसलेला आहे.या चौखूर उधळलेल्या घोड्याला लगाम घालण्याचे काम पोलीस खातेच करीत असते जेव्हा-जेव्हा किचकट गुन्ह्याचा छडा लागत नाही तेव्हा- तेव्हा क्राईम बॅच पुढे येऊनत्याचा तपास करीत असते व आरोपींना जेरबंद करण्यात यशस्वी होते.

राज्यभरात कोवीड-१९ या आजारामध्ये उपचारासाठी लागणारे आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनाचा तुटवडा झाल्याने काही लोकं त्याची चढ्या भावात विक्री करुन काळा बाजार करीत असल्याने त्यांना शोधून कारवाई करण्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त बीपीन कुमार सिंग, अप्पर पोलीस आयुक्त(गुन्हे) डॉ.शेखर पाटील, व पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील यांनी आदेश केले होते.

त्यानूसार गुन्हे शाखा कक्ष - २ चे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना त्यांच्या गुप्त खबऱ्याने माहिती दिलीकी, खांदा कॉलनी ता.पनवेल येथील खांदेश हॉटेलसमोर एक इसम रेमडेसिवीर हे इंजेक्शन ३५,०००-रुपये या अतिरिक्त भावाने ब्लॅक मार्केटगिं करण्यासाठी येणार आहे.सदर माहिती गुन्हे शाखा कक्ष - २ चे व.पो.निरी. गिरीधर गोरे यांना कळविण्यात आली. त्यांनी सदर माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त(गुन्हे)विनोद चव्हाण यांच्यासह वरीष्ठांना कळविली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब प्राप्त माहितीच्या ठिकाणी गुप्त सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेण्याचे गोरे यांनी पथकाला सांगत ताबडतोब या कामासाठी त्यांच्यासह स.पो.निरी. प्रविण खडतरे,पो.हवा.अनिल पाटील,साळुखे,रुपेश पाटील,सचीन पवार,सुनिल कुदळे,सुर्यवंशी,सचीन म्हात्रे यांना एकत्र करुन सदर इसम कुठे व कसा येणार आहे.तो कसा दिसतो? कुणी कसा इशारा करायचा? अशा सूचना देवून मार्गदर्शन करुन खांदा कॉलनी येथे सापळा रचला. सदर इसमास ओळखणाऱ्या

खबऱ्यास लांब उभे करण्यात आले.आणि ते त्या सावजाची वाट पाहू लागले.ठरलेल्या वेळेपेक्षा दोन तास उशिराने संशयित इसम खबऱ्याला दिसताच त्याने व.पो.निरी. गिरीधर गोरे यांना सूचक इशारा केला असता ताबडतोब चारी बाजूने पथकाने त्याला घेरले व ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे नाव राहूल देवराव कानडे वय ३८ वर्ष धंदा लॅब टेक्निशियन रा.कळंबोली ता.पनवेल असे समजले. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे HETRO, Cipla, Remwin या कंपनीचे प्रत्येकी एक असे एकूण तीन इंजेक्शन त्याच्याकडे मिळून आले. त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आले. सदर कारवाई कामी अन्न व औषध प्रशासन रायगडचे सहाय्यक आयुक्त गिरीश हुकरे,औषध निरीक्षक मनजीत सिंग राजपाल, यांचे सहकार्य घेवून खांदेश्वर पोलीस ठाण्यात गु.र.क्र.१०४/२०२१ भा.द.वि. कलम ४२० सह औषध किंमत नियंत्रण आदेश २००३ परिच्छेद २६, सह जीवनावश्यक वस्तूंचे अधिनियम १९५५ चे वाचन कलम ३(२)(सी)दंडनीय कलम ७(१)(ए)(२)सह औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व त्याखालील नियममधील कलम १८(ब)चे दंडनीय २७(बी),१८-ई चे दंडनीय २८ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करुन राहूल देवराव कानडे वय ३८ वर्ष यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली.

या गुन्ह्यासंदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग, अप्पर पोलीस आयुक्त(गुन्हे) डॉ.शेखर पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.निरी. गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली स.पो.निरी, प्रविण खडतरे, पो.हवा. अनिल पाटील, साळुखे, रुपेश पाटील, सचीन पवार, सुनिल कुदळे, सुर्यवंशी, सचीन म्हात्रे यांनी तपासाकामी अथक परीश्रम घेतले. या गुन्ह्यामध्ये मोठ मोठे मासे अडकण्याची शक्यता असून खऱ्या सूत्रधारांना लवकरच अटक करण्याच्या दृष्टीने पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल नवी मुंबई हे करीत आहेत.