CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

बारबाला रोशनीची अदाच भारी प्रियकराला म्हणते .......

CRIME BORDER | 27 December | 02:45 PM

ती ३५ वर्षाची रोनी शेख बारमध्ये काम करायची गेल्या दोन वर्षापासून तीचे प. बंगालच्या सपनशी प्रेम संबंध जुळले. तो तिच्या घरी जात येत असे. रोशनीने तिचा प्रियकर असलेल्या सपनकडे कपड्यासाठी पैशाची मागणी केली तेव्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात सपनने तिचा गळा आवळून ठार मारले. आपले कृत्य उघडकीस येवू नये म्हणून रोश नीचा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा असा बनाव करण्यासाठी त्याने तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल चोरुन नेले. पण घटनास्थळावरुन दारुच्या बाटलीवरील बॅचवरुन दहिसर पोलीसांनी प.बंगालमधून सपनला गजाआड करण्याची कौतूकास्पद कामगिरी केली.

दहिसर / मुंबईः रोशीनी शेख ही ३५ वर्षाची महिला बार मध्ये काम करायची. त्याठिकाणी अनेक प्रकारचे व्यसनी लोकं येत असत. मुंबईमध्ये अनेक बारमध्ये बारबाला या महिला वेटरचे काम करीत असतात. त्या महिला वेटर काय काय काम करतात. हे वेगळं सांगयची गरज नाही. रोशीनी ही बारमध्ये काम करीत असल्याने तिची राहणीमानही चांगले व आकर्षक असायचे. तिने हळूहळू बराच पैसा जमा करुन सोन्याचे दागिने बनविले होते. रोशनीने आपले गाव सोडून मुंबईत आता बस्तान बसविले होते. तिचे अनेक मित्र मैत्रीणी झाले होते. आता ती मुंबईत चांगलीच बार संस्कृतीत रुढली होती. तिला आता एका मित्राची गरज भासत होती. तिला चांगला विश्वासू व पैसा खर्च करणारा पार्टनर हवा होता. मुंबईत पोटा पाण्याच्या शोधात पश्चिम बंगाल मधून सपन रोहिदास वय वर्ष ३२ हा तरुण आला होता. त्याने रावळपाडा येथे भाड्याने खोली घेतली व तो तिथे राहू लागला. तो एकटाच असल्याने मिळेल ते काम तो करु लागला होता. सपनचे लग्न झाले होते. त्याची बायका व मुलं त्याच्या मूळगावी राहत असल्याने तो कमवलेल्या पैशातून खर्चापुरते पैसे ठेवून बाकी पैसे गावी पाठवायचा. त्याची पोटाची भूक तर भागत होती पण पोटाखालची भूक त्याला सतावत होती. मग तो कुणी सावज मिळते का या शोधात असायचा. त्याला हळूहळू दारु पिण्याचे व्यसन जळले. २०१८ मध्ये तो त्या बारमध्ये दारु पिण्यासाठी गेला होता. तिथे महिला वेटर असल्याने त्याची नजर भिरभिरु लागली. त्याला दारु सर्व्ह करणारी रोशनी खूप आवडली. मग तो तिला पाहण्यासाठी रोज त्या बारमध्ये जावू लागला. आणि तिच्याकडून सर्व्ह करुन घेवू लागला. तो सतत तिच्याकडे बघत असल्याचे रोशनीच्या लक्षात आले. व ती त्याला प्रितसाद देवू लागली. सपनने रोशनीशी जवळीक साधली. ते दोघं आता एकमेकांना ओळखू लागले होते. काही दिवसानंतर त्या दोघांत चांगली मैत्री जमली. त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. आणि ते एकमेकाशी बोलू लागले. लवकरच ओळखीचे रुपांतर मैत्रीत व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सपन हा रोशनीसोबत बाहेर हिंडू फिरू लागला. हॉटेल, पिक्चर, गार्डन, अशा ठिकाणी ते जात असत. रोशनीही खूश होती. सपन तिच्यावर खर्च करत होता. रोशनीने त्याला तिच्या घरी येण्याजाण्याची परवानगी दिली.

रोशनी ही दहिसर येथील जनकल्याण बिलि्ंडग मधील नंबर २ बी विंग, रुम नं.७०२ मध्ये रहायला होती. तिथे त्या दोघांनी मर्यादा ओलांडल्या. व त्यांच्यात अनैतिक शारीरीक संबंध प्रस्तापित झाले. दोघेही खूष होते. रोशनीला माहित होते की सपनचे लग्न झालेले आहे तरीही ती त्याच्यासोबत प्रेम संबंध ठेवून होती. त्यांच्या या संबंधाला आता दोन वर्ष झाली होते. रोशनी बारमध्ये काम करीत असल्याने तिलाही दारु पिण्याचे सवय लागली होती. सपन हा तिच्या घरी तिला भेटायला जात असतांना दारुची बाटली घेवून जात असे. त्या रात्री बारा साडे बारा वाजता सपनला रोशनीची आठवण सतावत असल्याने तो त्याच्या घरातून बाहेर पडला आणि तडक वाईन शा@पवर पोहोचला. तिथे त्या दोघांची ब्रँड असलेली ओडका, दारुची बाटली त्याने घेतली व रोशनीच्या फ्लॅटवर पोहोचला त्या दोघांनी गप्पा गोष्टी करत दारु पार्टी केली. हळूहळू नशेचा अमंल दोघांवर होत होता. बोलता बोलता रोशनी सपनला म्हणाली की, मला नवीन कपडे घ्यायचे आहेत. त्यासाठी मला तू पैसे दे. हे ऐकून सपनने तिला पैसे देण्यास नकार दिला. पैशाच्या वादावरुन त्यांच्यात तूऽऽ तूऽऽ मैंऽऽ मैंऽऽ होवू लागली. रोशनीला सपनचा राग आला. ती त्याला म्हणाली की, तू विवाहित असून सुद्धा तुझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले आहेत. त्याची तुला कदर नाही का? तू मला पैसे दिले नाही तर आपल्या संबंधाबाबत मी तुझ्या बायकोला सांगून टाकेल हे ऐकताच सपनला तिचा राग आला. अगोदरच डोक्यात दारुची शिरशिरी असल्याने त्याने मागचा पुढचा काहिएक विचार न करता संतापातच बाजूला पडलेला टॉवेल घेतला व रोशनीच्या गळ्यात टाकून तिचा गळा त्याने आवयला सुरुवात केली. रोशनीसुद्धा नशेत असल्याने ती जास्त प्रितकार करु शकली नाही. थोड्याच वेळात तिची तडफड बंद झाली. तिची हालचाल बंद झाल्याचे पाहून त्याने तिला सोडले. रोशनी मयत झाल्याची खात्री होताच तो तिच्या जवळ बसून आता पुढे काय याचा विचार करु लागला. आपण तिला मारले. याचा संशय येवू नये म्हणून काय करावे. हे तो विचार करत असतांना रोशनीच्या घरात चोरांनी चोरीच्या उद्देशाने घूसून तिचा खून केला असावा असा भास निर्माण करण्याचे ठरविले. त्याने तिच्या गळ्यातील एक लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तीन मोबाईल फोन व रोख रक्कम त्याने घेतली. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त करुन टाकले. व तेथून पळ काढला. जातांना त्याने रोशनीच्या घराची चाबी सोबत घेतली. आणि लॅच ओपन करुन दरवाजा बाहेरुन ओढून घेतला. त्यामुळे दरवाजा आतून बंद झाला. रोशनीचा खून करुन त्याने थेट प.बंगालमधील त्याचे गाव गाठले.

दुसऱ्या दिवशी रोशनीच्या घरी काम करणारी तिची मोलकरीन आली व तिने दरवाजा बऱ्याचदा वाजवला परंतु आतून रोशनी दरवाजा न उघडल्याने ती विचारात पडली की, रोशनी दरवाजा का उघडत नाही. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. म्हणून ती तडक रुमच्या मालकाकडे गेली. व म्हणाली की, रोशनी आतून दरवाजा उघडत नाही. त्यामुळे आत काहितरी घडले असावे असे मला वाटते. हे ऐकताच घरमालक जनकल्याण बिलि्ंडगमध्ये पोहोचले. त्यांनीही दरवाजा ठोठावला. रोशनी रोशनी असा आवाज दिला. पण आतून काहिच प्रितसाद येत नसल्याने त्यांच्या मनातही विचित्र संशय आला. उउगाच झंझट नको म्हणून त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात फोन करुन कळविले की, माझ्या रुममध्ये बारमध्ये काम करणारी महिला वेटर रोशनी ही आतून दरवाजा उघडत नाही. त्यामुळे आपण त्वरीत इथे यावे. काहितरी विचित्र घटना घडली असावी असा आम्हाला संशय आहे.

त्यादिवशी दहिसर पोलीस ठाण्यात दिवस पाळी ला फौजदार सिद्धार्थ दूधमल कर्तव्यावर होते. त्यांनी सदर घटनेची माहिती पो.निरी. मराठे, स.पो.निरी. जगदाडे यांना दिली असता हे अधिकारी पोलीस पथकासह रोशनी शेख राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले. तिथे गेल्यावर त्यांनी मालकाला डुब्लीकेट चाबी बनविणाऱ्या व्यक्तिला बोलविण्यास सांगितले. चाबीने त्याच्याकडून ती रुम उघडण्यात आली. पोलीसांनी रुममध्ये जावून पाहणी केली असता बेडरुममध्ये रोशनी झोपलेल्या अवस्थेत त्यांना दिसली. त्यांनी तिला उठविण्याचा प्रयत्न केला. तिची काहि एक हालचाल होत नसल्याचे पाहून तिची बारीक पाहणी केली असता मयत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी तत्काळ व.पो.निरी. एम.एम. मुजावर आणि पो.निरी.(गुन्हे) सुरेश रोकडे यांना सदर घटनेची माहिती कळविली. सदर माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोलीस पथकासह धाव घेतली. त्यांनी रोशनीच्या मृतदेहाची पाहणी केली.तिचा मृत्यू हा अकस्मात आहे की, घातपात आहे याची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर तिच्याबाबत अधिक चौकशी केली असता तिच्या घरी काम करणारी कामवाली तिच्याकडून माहिती घेतली असता तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, मोबाईल दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. घरातील अस्ताव्यस्त सामान पाहून कुणीतरी चोरट्याने तिचा खून केला असावा. असा अंदाज पोलीसांनी काढला. रोशनीचा खून करुन तिच्या जवळील रोख रक्कम, दागिने, मोबाईल, त्याने नेले असावेत. असा अंदाज पोलीसांना येत होता. त्यांनी घराची अत्यंत बारकाईने पाहणी केली तेव्हा घरात दोन काचेचे ग्लास व एक ग्रीन ऍपल ओडका दारुची बाटली दिसली. त्यावरुन घरात कुणीतरी ओळखीचा व्यक्ती येवून याठिकाणी दारु पिवून तिची हत्या करुन दागिने चोरुन त्याने पोबारा केला आहे. हे स्पष्ट दिसत होते. सदर घटनेची माहिती पो.उपा. डॉ.डी.एस.स्वामी, स.पो.आयुक्त सुहास पाटील यांना देण्यात आली असता त्यांनी घटनास्थळी येवून मयत रोशनीच्या मृतदेहाची व घटनास्थळाची पाहणी करुन दहिसर पोलीसांना उपयुक्त सूचना व मार्गदर्शन करुन घटनेचा तपास जलद करण्याचे आदेश दिले.

दहिसर पोलीस ठाण्यात रोशनी शेख हिच्या मृत्यू संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तिचा मृत्यू हा संशयास्पद असल्याने तिचे शव पोस्टमार्टेमसाठी तत्काU पाठविण्यात आले. वैद्यकिय अधिकाऱ्याकडून तातडीने मृत्यूचा अहवाल मागविला असता रोशनीच्या मृत्यूचा प्रथमिक अहवालात तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समजले. म्हणून या खूनाच्या प्रकाराचा तपास व.पो.निरी. मुजावर यांनी पो.निरी.(गुन्हे) सुरेश रोकडे यांच्याकडे सोपविला.

पोलीसांनी चौकशी आरंभली. रोशनी ज्या बारमध्ये काम करत होती तिथे व बिलि्ंडमधील शेजाऱ्यापाजार्यांकडे तिच्याबाबत अधिक माहिती पोलीसांनी मिळविली. तसेच घटनास्थळावरुन मिळालेली बाटली पंचनाम्यात जप्त केली होती. त्या बाटलीचा बॅच नं. शोधून ती बाटली कुठल्या दुकानातून गिऱ्हाहीकाला विकण्यात आली याची माहिती काढण्यासाठी पोलीस पथक कामाला लागले. या पथकाने तांत्रिक बाबीचा कौशल्यपूर्वक अभ्यास सुरु केला. रोशनी शेख हिच्या घरातून तीन मोबाईल, दोन पदरी मंगUसूत्र, एक पदरी मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे ब्रेसलेट, पायातील सोन्याचे पैंजन व नाकातील चमकी अशा प्रकारचा ऐवज चोरीस गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्याच बरोबर रोशनी ज्या बारमध्ये काम करीत होती. तेथील सीसी टिव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले तर ती राहत असलेल्या जनकल्याण बिलि्ंडगमधील लावलेल्या सीसीटिव्हींचे फुटेज तपासणी साठी ताब्यात घेतले.

दारुच्या बाटलीवरील बॅचवरुन ती बाटली ज्या दुकानातून विकल्या गेली होती त्या स्मिता वाईन शॉपला शोधून तेथील फुटेजसुद्धा ताब्यात घेण्यात आले. जनकल्याण बिलि्ंडगमधून घटनेच्या रात्री कोण कोण आले व कोण कोण गेले याची पाहणी केली तेव्हा त्यांना रात्री बारा वाजता एक इसम बिल्डींग मध्ये येत असतांना त्यांना दिसला. पोलीसांनी त्याचे छायाचित्र काढून तपास कामी पाठविले. तोच इसम दारुच्या दुकानात दारु घेतांना आढळल्याने त्याच्यावर पोलीसांचा संशय बळावला. स्मिता वाईन शॉपमधून दारु घेत असलेला इसम व रोशनी शेख राहत असलेल्या बिल्डींग मधील सीसीटिव्ही फुटेजमधील तो इसमच असल्याने त्याचा शोध सुुरु करण्यात आला. तपासादरम्यान त्या इसमाचे नाव सपन रुईदास असून तो मूळ प.बंगाल येथील कलकत्ता जि.हावडा ता.शाहपूर, आमरदहा येथे राहणारा असल्याचे पोलीसांना समजले. तो दहिसर येथील रावळपाडा येथे भाड्याच्या खोलीत राहतो. एवढी बित्तंबातमी काढून साध्या वेशातील पोलीस पथकाने रावळपाड्यात त्याच्या रुमवर छापा मारला पण तो त्या ठिकाणाहून त्यांना मिळून आला नाही.

सपनला पकडण्यासाठी एक पोलीस पथक प.बंगाल येथील आमरदहा या गावी पोहोचले. तेथून त्याला शोधून ताब्यात घेवून मुंबईत आणले. त्याच्याकडे रोशनी शेख च्या खूनासंदर्भात चौकशी केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला. पण पोलीसांना त्याच्यावर पक्का संशय असल्याने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करुन त्याला बरोबर प्रश्नांच्या गोंधळात टाकले. तसेच त्याला खास पोलीसी इंगा दाखविला तेव्हा तो सूतासारखा सरळ झाला. पोलीस तपासात त्याने रोशनी शेख चा खून केल्याचे कबूल केले. चौकशीत त्याने सांगितले की, रोशनी शेख मला सतत पैशाची मागणी करीत होती. तसेच ती माझ्या पत्नीला आमच्या अफेयर बद्दल सांगण्याची धमकी देत असल्याने मला तिचा राग आला. तिची कायमची कटकट बंद करण्यासाठी मी तिचा रुमालाने गळा आवळून खून करुन माझ्यावर संशय येवू नये म्हणून चोरीचा शीन तयार करुन घरातील सोने व रोख रक्कम घेवून पळून गेले.

घटनेच्या दुसर्या दिवशी मोलकरणीने दुपारी बारा व सायं. चार वाजताच्या सुमारास दरवाजा वाजवला असता तिने दरवाजा उघडला नाही. म्हणून तिने घरमालकाला कळविले. खरोखर दरवाजा रोशनी उघडत नव्हती. म्हणून पोलीसांना पाचारण करण्यात आले. व दहिसर पोलीसांना हा धक्कादायक प्रकार दिसला. सपन रोहिदास याने गुन्हा कबूल केल्याने त्याला रितसर अटक करुन कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. कोठडी दरम्यान पोलीसांनी याच्याकडून त्याने चोरलेले सर्व दागिने, मोबाईल फोन हस्तगत केले. सपन हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

खूनाच्या तपासकामी कोणताही धागादोरा हाती नसतांना अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभागाचे दिलीप सावंत, परीमंडळ १२चे डिसीपी डॉ.डी.एस.स्वामी, एसीपी सुहास पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली दहिसर पोलीस ठाण्याचे व.पो.निरी. एम.एम. मुजावर यांच्या नेतृत्त्वाखाली पो.निरी.(गुन्हे) सुरेश रोकडे यांनी स.पो.निरी. डॉ.चंद्रकांत घार्घे, ओम तोटावार, जगदाडे, फौजदार सिद्धार्थ दुधमल, पो.हवा. परब, जगताप, पो.ना. ठाकरे, माहिते, पांगे, पोळ , शेख, पो.शि . केळजी, सांबरेकर, शिरसाठ, हिरेमठ, लहांगे, सांगळे , यांनी अथक परीश्रम घेतले.

- राजेंद्र वखरे (डोंबिवली)