CRIME BORDER | 26 December 2025 | 05:59 PM
ठाणे :- प्रकाश बाबू चव्हाण (वय 58 वर्षे, राह. रुम नं.36, पाचवा मजला, रायलादेवी अपार्टमेंट, डि विंग, रोड नं.02, वागळे ईस्टेट, ठाणे पश्चिम) हे हरविल्याची नोंद वागळे ईस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
हरविलेल्या इसमाचे वर्णन:- रंग सावळा, उंची 4 फूट 6 इंच, बांधा सडपातळ, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे काळे, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी काळी - पांढरी, अंगात पांढऱ्या रंगाचा फुल चेस शर्ट व राखाडी रंगाची फुल पॅन्ट, काळ्या मरुन रंगाची चप्पल सॅन्डल.
तरी वरील प्रकाश बाबू चव्हाण जर कोणास आढळल्यास तर त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वागळे ईस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एस.पी.जाधव यांनी केले आहे.