CRIME BORDER | 16 January 2026 | 06:27 PM
राजेंद्र वखरे यांजकडून
KDMC Election Results 2026 - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नगरसेवक पदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली ,असून या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २१ मध्ये एकाच घरातील तीन जणांनी आपापली जनमानसातील पकड सिद्ध केली.
यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून सून, भावजय व दीर हे तिघेही वेगवेगळ्या पक्षातून विजयी झाले आहेत.
यामुळे डोंबिवलीत म्हात्रे घराण्याची विविध पक्षातून निवडणूक लढवण्याची चर्चा जनमानसात चर्चिल्या जात आहे.
दिनांक १५ जानेवारी गुरुवार रोजी मतदान झाले तर १६ जानेवारी रोजी सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली होती सर्वच उमेदवारांचे चाहते निकालाची वाट बघत होते.
मतदानापूर्वीच सत्ताधारी महायुतीचे २१ उमेदवार निवडून आले.
डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २१ मधील तिन्हीही जागेवर म्हात्रे परिवाराने विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे.
यामध्ये
अ - प्रवर्ग (नागरिकांचा मागास प्रवर्ग) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रल्हाद म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रदीप जोशी यांचा पराभव केला. यामध्ये प्रल्हाद म्हात्रे यांना ९,९०८ मते मिळाली.
ब - प्रवर्ग : (सर्वसाधारण महिला) :- यामध्ये तरुण तडफदार उच्चशिक्षित डॉक्टर रवीना राहुल म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टी च्या तिकिटावर निवडणूक लढविली . यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या सुजाता परब यांचा पराभव केला असून त्यांना ८,५८५ मते मिळाली.
क - प्रवर्ग (सर्वसाधारण महिला) : शिवसेना शिंदे गट यांच्याकडून रेखा जनार्दन म्हात्रे यांनी निवडणूक लढवली यामध्ये त्यांनी ठाकरे गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला यामध्ये रेखा मात्रे यांना १०,८६१ मते मिळाली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे १५ व शिवसेनेचे सहा मिळून २१ उमेदवार यापूर्वीच निवडून आले आहेत त्यापैकी १९ बिनविरोध उमेदवार हे डोंबिवलीकर आहेत.
डोंबिवली हा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मतदारसंघ आहे त्यांनी १५ उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची कामगिरी केली.
तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा शिवसेनेचे सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले आहेत.
कल्याण डोंबिवली मधील भारतीय जनता पार्टीच्या रंजना पेणकर ,आसावरी नवरे, मंदा पाटील, ज्योती पाटील, रेखा चौधरी, मुकंद तथा विशू पेडणेकर ,महेश पाटील, साई शेलार, दीपेश म्हात्रे , जयेश म्हात्रे, हर्षदा भोईर, डॉक्टर सुनिता पाटील ,पूजा म्हात्रे, रवीना माळी, मंदार हळबे हे उमेदवार बिनविरोध विजय झालेले आहेत.