CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

भारतीय प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न

प्रधान कार्यालय : मुख्य संपादक : राजेंद्र वखरे

CRIME BORDER | 19 January 2026 | 06:24 PM

भारतीय प्रजासत्ताक दिन  पूर्वतयारीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न

नवी मुंबई :-भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाच्या सामान्य शाखेच्या अपर आयुक्त फरोग मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली  विभागीय आयुक्त कार्यालय समिती सभागृहात आज संपन्न झाली.

कोकण विभागीय स्तरावरील भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन समारंभ  दि. 26 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 09.15  वाजता साजरा होणार आहे.  मुख्य शासकीय ध्वजारोहण कळंबोली सेक्टर 17 येथील पोलीस मुख्यालय मैदानावर होणार आहे. त्यानुषंगाने बैठकीत मार्गदर्शन करताना श्रीमती मुकादम यांनी कोकण भवनातील सर्व विभागाने हा सोहळा यशस्वीरित्या व उत्साहात साजरा करण्याबाबत सूचना दिल्या.  प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी आणि हा कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, असे सांगून सर्वांनी शासकीय पोशाखात कार्यक्रमास उपस्थित राहाव, असे त्यांनी यावेळी सांगितले.  

या बैठकीत पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांसह कोकण विभागातील विविध शासकीय विभागांचे  अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.