CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स आणि डोंबिवली येथील प्रगती महाविद्यालयाचे एनएसएस युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने

एनएसएस युनिटच्या निवासी शिबिरात दंत तपासणी शिबिर संपन्न

CRIME BORDER | 20 January 2026 | 07:12 PM

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स आणि डोंबिवली येथील प्रगती महाविद्यालयाचे एनएसएस युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने

डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स आणि डोंबिवली येथील प्रगती महाविद्यालयाचे एनएसएस युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने एनएसएस युनिटच्या निवासी शिबिरात दंत तपासणी शिबिर डेंटल चेकअप कॅम्प. आपटी गाव कल्याण तालुका येथे आयोजित एनएसएसच्या निवासी शिबिरात सदर दंत तपासणी शिबिर आयोजित केल्याने या शिबिराचा लाभ एकूण ७० विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी घेतला रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स चे सभासद दंतचिकित्सक डॉक्टर तुषार आव्हाड यांचा मोलाचा सहभाग हे शिबिर आयोजित करण्यात मिळाला.

दातांची निगा कशी ठेवावी याचे मार्गदर्शन आणि तंबाखूजन्य पदार्थांची सवय सोडून देण्याचे आवाहन याप्रसंगी डॉक्टरांनी केले. याच दिवशी एनएसएस शिबिरातील विद्यार्थ्यांसाठी याच रोटरी क्लब तर्फे मानसिकता कशी बदलू शकतो .या विषयावर 'माईंडफुल मंत्राच्या' श्रेया कुलकर्णी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार कसे करावेत याचे मार्गदर्शन त्यांनी याप्रसंगी केले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स तर्फे क्लबचे माजी अध्यक्ष निलेश सोनवणे तसेच क्लबचे सभासद शैलेश गोर हे या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित होते. 

क्लबचे सभासद  राजेश भावे यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून या कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली क्लबचे सेक्रेटरी उज्वल ठोंबरे यांनी महाविद्यालयाच्या एनएसएस युनिट प्रमुख डॉक्टरअनुजा बापट आणि महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांचे आभार मानले.