CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर संचलीत पेट्रोल / डिझेल पंपाचा लोकार्पण सोहळा व भूमीपुजन बेटावद बुद्रुक येथे संपन्न

CRIME BORDER | 22 January 2026 | 11:08 AM

कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर संचलीत पेट्रोल / डिझेल पंपाचा लोकार्पण सोहळा व भूमीपुजन बेटावद बुद्रुक येथे संपन्न

श्याम  पाटील : जामनेर तालुका प्रतिनिधी 

जामनेर : कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर च्या माध्यमातुन शेतकरी बांधव व्यापारी व पंचक्रोशीतील नागरीक यांच्या सेवार्थ पेट्रोल व डिझेल पंपाचा लोकार्पण सोहळा  व ८० टन वजन काट्याचे  भूमीपुजन  जामनेर नगरपरीषदच्या लोकनियुक नगरध्यक्षा तथा जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्य मा.  गिरीष महाजन यांच्या धर्मपत्नी सौ. साधना ताई महाजन यांच्या हस्ते बेटावद बुद्रुक शिवार जामठी रोड येथे संपन्न झाला.  

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ. साधना ताई महाजन होत्या सुत्रसंचालन सुनिल कलाल व वासुदेव घोंगडे यांनी केले.

जे.के.चव्हाण (से नि .) उपअभियंता जि.प. जळगांव यांनी मार्गदशनपर भाषण केले कार्यक्रमाला चंद्रकांत बावीस्कर , जितेद्र पाटील , संजय गरुड, आकाश गोखले, विलास बापू पाटील कृ.उ.बा.स.सभापती, अशोक पाटील , उप सभापती ,तुकडूदास  नाईक ,अशोक काशिनाथ भोयटे ,मागीलाल गील , धनंजय भोयटे ,सौ. रुपाली विजय भोयटे, सरपंच बेटावद बु व सर्व संचालक कृ.उ.बा.स. जामनेर भा.ज.प. कार्येकर्ते व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते .