CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आपण यांना पाहिलत का? हरविलेल्या महिला रोशनी हंस सोनार यांचा शोध

संपादिका : सौ. सीमा वखरे

CRIME BORDER | 22 January 2026 | 11:31 AM

No image available

संपादिका : सौ. सीमा वखरे 

ठाणे  :- रोशनी हंस सोनार (वय 28 वर्षे, रा. रुम नं.19, एम.आय.डी.सी. कॉलनी, राल्यादेवी पाडा, वागळे ईस्टेट, ठाणे) ही महिला हरविल्याचे नोंद वागळे ईस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

हरविलेल्या महिलेचे वर्णन :- रंग गोरा, नाक सरळ, अंगाने सडपातळ, उंची 5फूट 1 इंच, चेहरा उभट, डोळे काळे लांब, अंगात पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, नरसरत पायात साधी चप्पल.

तरी वरील वर्णनाच्या महिला रोशनी हंस सोनार जर कोणास आढळल्यास तर त्यांनी वागळे ईस्टेट पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन वागळे ईस्टेट पोलीस स्टेशनचे पो.ना. एस.पी.जाधव यांनी केले आहे.

000000000

आपण यांना पाहिलत का? हरविलेल्या इसम विठ्ठल कैलास काळबांडे यांचा शोध

ठाणे  :- विठ्ठल कैलास काळबांडे (वय 45 वर्षे, रा. डोंगरी गांव, फातिमा माता रोड, उत्थान, भाईंदर, ठाणे) हा इसम हरविल्याचे नोंद वागळे ईस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

हरविलेल्या इसमाचे वर्णन :- चेहरा गोल, रंग सावळा, डोळे उजवा डोळा नसून डाव्या डोळ्यात पांढरा ठिपका आहे. नाक सरळ, केस काळे लांब, केसाची ठेवण साधी व मोठे वाढलेले, बांधा मध्यम, उंची 5फूट 4 इंच, अंगात पांढऱ्या रंगाचा मळकट शर्ट, हाफ पॅन्ट घातली असून हातात काळा धागा बांधलेला आहे.

तरी वरील वर्णनाचा इसम विठ्ठल कैलास काळबांडे जर कोणास आढळल्यास तर त्यांनी वागळे ईस्टेट पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन वागळे ईस्टेट पोलीस स्टेशनचे पोलीस हवादार ए.बी.वडे यांनी केले आहे.

000000000

आपण यांना पाहिलत का? हरविलेल्या इसम मोहन रामचंद्र कांबळे यांचा शोध

ठाणे :- मोहन रामचंद्र कांबळे (वय 70 वर्षे, रा. आर/1, रुम नं.1003, जिजामाता नगर, गृहनिर्माण संस्था, वागळे ईस्टेट, ठाणे) हा इसम हरविल्याचे नोंद वागळे ईस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

हरविलेल्या इसमाचे वर्णन :- चेहरा उभट, नाक सरळ, रंग गव्हाळ सावळा,  5 फूट 6 इंच, सडपातळ बांधा, डोळे काळे, डोक्याचे केस पांडरे व लहान तसेच दाढी मिशी पांढरी आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा फल शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातली असून उजव्या पायाने लंगडत चालतात.

तरी वरील वर्णनाचा इसम मोहन रामचंद्र कांबळे जर कोणास आढळल्यास तर त्यांनी वागळे ईस्टेट पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन वागळे ईस्टेट पोलीस स्टेशनचे पोलीस हवादार पी.एस.कोयंडे यांनी केले आहे.

000000000

आपण यांना पाहिलत का? अनोळखी मयत इसमाचे वारस / नातेवाईकांचा शोध

ठाणे  :- अनोळखी मयत इसम (वय अंदाजे 42 वर्षे) नाव व पत्ता माहिती नाही, सॅटीस ब्रिज येथे टी.एम.टी. बस स्टॉप  हा बेशुध्द अवस्थेत कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नसल्याने त्यास औषधोपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल, ठाणे येथे घेवून गेले असता ड्युटीवरील डॉक्टरांनी तपासून त्याचे निधन झल्याची नोंद ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

अनोळखी मयत इसमाचे वर्णन :- मध्यम बांधा, रंग गहुवर्णीय, नाक सरळ, डोळे बंद, तोंड बंद, दाढीचे केस बारीक पांढरे,  5 फूट 5 इंच, अंगात लाल रंगाचे स्वेटर च निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट दिसत आहे.

तरी वरील वर्णनाच्या मयत इसमाचे जर कोणी वारस किंवा नातेवाईक असतील तर त्यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे नगर पोलीस स्टेशनचे पोलीस हवादार आर.जे.संकुडे यांनी केले आहे.