CRIME BORDER | 22 January 2026 | 05:03 PM
ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रीय/समारंभीय पोषाख परिधान करण्यात यावा. ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी 8-30 ते 10 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहणाचा समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8-30 पूर्वी किंवा सकाळी 10 वाजेनंतर करावा.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणी सत्याग्रही, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, नागरिक, शासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी अशा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.