पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी तत्काळ नियुक्त करणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136
मुख्य संपादक : राजेंद्र वखरे
संपादिका : सौ. सीमा राजेंद्र वखरे
पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी तत्काळ नियुक्त करणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136
UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे यांनी ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स ची आयोजित स्वच्छता मोहीम संपन्न
प्रगती महाविद्यालय डोंबिवली चे एनएसएस युनिट सहभागी
CRIME BORDER|
23 January 2026
|
01:29 PM
डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स आणि प्रगती महाविद्यालय डोंबिवली चे एनएसएस युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली एमआयडीसी येथील एसटी स्टँड येथे दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी स्वच्छता अभियान पार पडले. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे महत्व सांगण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात आले. यात महाविद्यालयाच्या २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व एसटी स्टँड आणि परिसर स्वच्छ केला.
या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सचे अध्यक्ष बॉबी पिंटों ,माजी अध्यक्ष निलेश सोनवणे तसेच क्लबचे सभासद शैलेश गोर, प्रशांत दामले व 'क्राईम बॉर्डर' चे संपादक राजेंद्र वखरे,राजेश भावे कल्याण एसटी आगाराचे प्रमुख श्री जाधव साहेब हे ह्या अभियानास आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी विद्यार्थ्यांचे , रोटरी क्लबचे, महाविद्यालयाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन रोटरी क्लब तर्फे निलेश सोनावणे व राजेश भावे आणि महाविद्यालयातर्फे एनएसएस युनिटच्या प्रमुख डॉ. अनुजा बापट यांनी यशस्वीपणे केले.