CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

भुसावळ शहरासह ग्रामीण भागात उपद्रवीवर कडक कारवाईचे आदेश

सुरेश कोळी : भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी

CRIME BORDER | 23 January 2026 | 04:10 PM

भुसावळ शहरासह ग्रामीण भागात उपद्रवीवर कडक कारवाईचे आदेश

सुरेश कोळी : भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी / डॉ.शशिकांत काळे : नाशिक विभागीय संपादक 

भुसावळ :  भुसावळ शहरातील व ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने उपद्रवी विरोधात चौकशी हद्दपारसाठी करत कडक पावले उचलली आहेत. 

प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेले प्रस्ताव आता चौकशीसाठी डी. वाय. एस .पी. कार्यालयाकडे पुन्हा पाठवण्यात आले असून त्यांची बारकाईने चौकशी सुरू करण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रापासून उपद्रवी व्यक्ती विरोधात तयार करण्यात आलेले हद्दपारिप्रस्ताव प्रथम अप्पर पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आले होते, त्यानंतर हे प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर प्रांत अधिकाऱ्यांनी हे प्रस्ताव पुन्हा डी. वाय. एस. पी. कार्यालयाकडे पाठवत संबंधित व्यक्तीचे म्हणणे नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. 

यानुसार डी .वाय. एस.पी .केदारे बारबोले यांनी संबंधित व्यक्तींना नोटीस बजावल्या असून त्यांना कार्यालयात बोलावून त्यांचे म्हणणे एकूण घेतले जाणार आहे .या चौकशीनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असून हद्दपारची कारवाई निश्चित होण्याची शक्यता आहे .दरम्यान आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासक सतर्क झाले आहे .भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील कार्यक्षेत्रातील उपद्रवी व्यक्ती विरोधातही हद्दपारचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही उपद्रवीवर कडक कारवाई होण्याचे संकेत मिळत आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे शहरासह ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेची भावना वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.