CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ग्रंथ सादर करण्याचे आवाहन

CRIME BORDER | 25 January 2026 | 10:48 AM

No image available
नवी मुंबई :-   राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी 'ग्रंथभेट' योजने अंतर्गत सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करुन राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येतात. तरी सर्व लेखक, प्रकाशक यांनी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ग्रंथांची निवड करण्यासाठी तसेच ग्रंथालय संचालनालय स्तरावरुन प्रसिध्द होणाऱ्या 'शासनमान्य ग्रंथ निवड यादी' मध्ये समावेश होण्याच्या दृष्टीने सन 2025 या कॅलेंडर वर्षात (दि. 1 जानेवारी, 2025 ते दि. 31 डिसेंबर, 2025) प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामुल्य प्रत (Complimentary copy) ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे  दिनांक 28 फेब्रुवारी, 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

दि. 28 फेब्रुवारी, 2026 नंतर प्राप्त झालेल्या ग्रंथांचा ग्रंथ निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेसाठी सन 2025 या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.

तसेच, मुद्रण व नोंदणी अधिनियम, 1867 अन्वये मुद्रकाने व ग्रंथ प्रदान अधिनियम, 1954 अन्वये प्रकाशकाने सदर ग्रंथाची प्रत्येकी एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे व शासकीय विभागीय ग्रंथालय, नागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. सदर ग्रंथ पोहोचल्याची पोच पावती संबंधीत ग्रंथालयांकडून घ्यावी. ग्रंथालय संचालनालयास संबंधित ग्रंथ पाठवितांना वरीलप्रमाणे ग्रंथ पाठविल्याची पोच पावती ग्रंथांसोबत टपालामार्फत वा समक्ष पाठविण्यात यावी.