CRIME BORDER | 25 January 2026 | 11:58 AM
सुरेश कोळी : भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
सालाबादाप्रमाणे या उपक्रमात निसर्गप्रेमी ,पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांना उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. चातक निसर्ग संवर्धन संस्था वरणगाव ,तालुका भुसावळ, हातनुर धरण जलाशयावर विविध देशात स्थलांतर करून येणारे पान पक्षी सह ,स्थानिक पक्षांचेही प्रमुख आश्रयस्थान आहे .जानेवारी महिन्यात येथे हजारो किलोमीटर प्रवास करून विविध दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण पक्षी दाखल होतात या पार्श्वभूमीवर पक्ष्यांची संख्या त्यांच्या प्रजाती ची नोंद त्यांचे वर्तन व अधिवास याबाबत राष्ट्रीय माहिती संकलित करण्याची ही गणना महत्त्वाची ठरणार आहे. आयोजकांच्या मते हा उपक्रम जैवविविधतेचे संवर्धन पर्यावरणीय जागरूकता वाढविण्यास तसेच भविष्यातील संशोधनाला चालना देईल.
चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे म्हणणे आहे की, पानपक्षी निरीक्षणाची आवड असलेल्यांना प्रत्येकासाठी हा उपक्रम एक प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.