CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

भारतीयानं अमेरिकेत पत्नीसह नातेवाईकांना संपवलं, कपाटात लपल्यानं मुलं बचावली, आरोपी जंगलात पळाला अन्..

CRIME BORDER | 25 January 2026 | 12:26 PM

भारतीयानं अमेरिकेत पत्नीसह नातेवाईकांना संपवलं, कपाटात लपल्यानं मुलं बचावली, आरोपी जंगलात पळाला अन्..
अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने आपल्याच घरात गोळीबार करून पत्नी आणि 3 नातेवाईकांची हत्या केली. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून, त्याचे नाव विजय कुमार (५१) असे आहे. अमेरिकेतली जॉर्जियामध्ये ही घटना घडली.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी विजय कुमारची तीन मुले घरातच होती. ती एका कपाटात लपली होती. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. अटलांटा येथील भारतातील वाणिज्य दूतावासाने या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जात आहे. दूतावासाने 'एक्स'वर पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही एका अत्यंत दुःखद गोळीबाराच्या घटनेमुळे खूप व्यथित झालो आहोत. ही घटना कौटुंबिक वादातून घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जात आहे.

अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय वंशाच्या व्यक्तीने पत्नीसह 4 नातेवाईकांवर गोळीबार करत संपवलं. कपाटात लपल्यामुळे मुले बचावली. घटनेनंतर आरोपीने जंगलात पळला होता. {महाराष्ट्र टाइम्स च्या एका वृत्तानुसार }