CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

‘थ्री आर’ अंतर्गत टाकाऊ प्लास्टिकपासून पुनर्निर्मित बेंचेसचे प्रजासत्ताक दिनी शाळा व संस्थांना वितरण

‘स्वच्छ सवयींमधून स्वच्छ भारत’ या विशेष अभियानांतर्गत लक्षवेधी उपक्रम

CRIME BORDER | 27 January 2026 | 10:46 AM

‘थ्री आर’ अंतर्गत टाकाऊ प्लास्टिकपासून पुनर्निर्मित बेंचेसचे प्रजासत्ताक दिनी शाळा व संस्थांना वितरण

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त सहभागातून संकलित सिंगल यूज प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून तयार केलेल्या बेंचेसचे वितरण नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, उद्यान विभाग उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक पिशव्या तसेच सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णत: बंद करून त्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती केली जात आहे. त्याचप्रमाणे ‘थ्री आर’ अंतर्गत प्लास्टिक संकलित करून त्यावर पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापरावर भर दिला जात आहे. याकरिता ‘प्रोजेक्ट मुंबई’ या पर्यावरणविषयक कार्य करणा-या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आलेला असून ‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई’ संकल्पना साकारण्यासाठी  विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. 

या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत 4 टनापर्यंत प्लास्टिक संकलन करण्यात आले असून त्याचा पुनर्वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये 47 हजाराहून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून पोहचलेलो असून 51 शाळा या उपक्रमात सहभागी झालेल्या आहेत.

या उपक्रमात माइंडस्पेस रिट यांचे विशेष सहकार्य लाभले असून त्यांच्या सहयोगाने सातत्याने सहभागी होणा-या 25 शाळा, 4 सोसायट्या, 4 स्वयंसेवी संस्था व 2 कॉर्पोरेट कार्यालये यांना 35 गार्डन बेंचेस उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात देण्यात येत आहेत. त्या बेंचेसचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत सुरू होत असलेल्या ‘स्वच्छ सवयींमधून स्वच्छ भारत’ या विशेष अभियानांतर्गत नमुंमपा शाळा क्र. 02 दिवाळेगाव, नमुंमपा शाळा क्र. 117 दिवाळे, नमुंमपा शाळा क्र. 10 नेरूळगाव, एमईएस विद्यामंदीर बेलापूर, विद्याभवन शाळा सेक्टर 18 नेरूळ, ज्ञानदीप सेवा मंडळ शाळा करावेगाव अशा 6 शाळांना करण्यात आले. विशेष म्हणजे हे पुनर्प्रक्रियाकृत बेंचेस विद्यार्थी आणि नागरिक यांनी आकर्षक रंगांनी व चित्रांनी सजविले आहेत.