CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

भुसावळ तालुक्यातील साकरी गावात एका माथे फिरूने दोन शाळकरी मुलींना विहिरीत ढकलले

CRIME BORDER | 27 January 2026 | 07:46 PM

भुसावळ तालुक्यातील साकरी गावात एका माथे फिरूने दोन शाळकरी मुलींना विहिरीत ढकलले

सुरेश कोळी : भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी

भुसावळ : तालुक्यातील साकरी येथे दोन अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलण्यात आले असून त्यांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुली इयत्ता नववीत शिक्षण घेत होत्या.  सकाळी घरून ७.३० वाजता गावातच शिकवणीसाठी त्या जात असत. नेहमीप्रमाणे आज सुद्धा त्या घरून निघाल्या. मात्र काही वेळातच गावात एकच खळबळ उडाली की, आपल्या गावातील ग्रामपंचायतीच्या विहिरीत शाळकरी मुलींचे दोन दप्तर पाण्यावर तरंगत आहे . गावातील व परिसरातील लोकांनी विहिरीकडे धाव घेत विहिरीत पाहणी केली असता दोघं मुलींचे प्रेत विहिरीत  आढळून आले.

१) लक्ष्मी अभय फेगडे, वय १५ राहणार साकरी,२)  नेहा विजय चौधरी, वय १५ राहणार साकरी, ता .भुसावळ असे मृत शाळकरी मुलींची नावे आहेत.

दोन्ही विद्यार्थीनी गावातच जनता हायस्कूल मध्ये शिक्षण घेत होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार गावातील एका संशयीतास बाजारपेठ पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करीत आहे.