CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बौध्द समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी 10 लक्ष रुपयांचे शासन अनुदान

या योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील बौध्द संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

CRIME BORDER | 30 January 2026 | 10:31 AM

No image available

ठाणे :- राज्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये 51 टक्के पेक्षा जास्त बौध्द समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौध्द समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व समाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी रू.10.00 लक्षच्या मर्यादित अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, अनुदान देय असलेल्या बाबी, प्रस्ताव सोबत जोडावयाची कागदपत्रे, योजनेच्या अटी शर्ती व कार्यपद्धतीची सविस्तरपणे माहिती महाराष्ट्र शासन, अल्पसंख्यांक विकास विभाग, शा.नि.क्र. अविवि 2024/प्र.क्र.75/का.6, दि.7 ऑक्टोबर, 2024 द्वारे देण्यात आली असून हा शासन निर्णय राज्य शासनाच्या https://gr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://thane.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

ठाणे जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या बौध्द समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व समाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता शासन अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्ज सादर करण्याचा दि. 20 फेब्रुवारी 2026 असून जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, 3 रा मजला, नियोजन भवन, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे अर्ज सादर करावेत, असे ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी कळविले आहे.