CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परिक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिध्द

CRIME BORDER | 30 January 2026 | 10:34 AM

No image available

ठाणे : - महाराष्ट्र राज्य परोक्षा परिषदमार्फत दि.28 डिसेंबर, 2025 रोजी इ.8वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याच्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https//www.mcepune.in/ https://२०२६ mennms.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

या परीक्षेच्या MAT व SAT विषयाच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन दि.16 जानेवारी 2026 अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दि.09 जानेवारी 2026 रोजीच्या प्रसिध्दी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच या परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही, याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.