CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पामध्ये संपादित होणाऱ्या जमिनीची फेरचौकशी

CRIME BORDER | 30 January 2026 | 10:35 AM

No image available

ठाणे :- विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या भूसंपादन मोजणीकरिता उप अधीक्षक भूमी अभिलेख, भिवंडी कार्यालयामार्फत फेरचौकशी तारखा नेमण्यात आलेल्या आहेत. मोजणीच्या वेळेस शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपल्या क्षेत्राची हद्द दाखवावी. शेतकरी उपस्थित न राहिल्यास मोजणी पूर्ण होऊ शकणार नाही आणि त्यानंतर संबंधित मोबदला दिवाणी न्यायालात जमा करावा लागेल, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हे भूसंपादन मोजणी काम शासनाच्या प्राधान्यक्रमावरील असल्याने या प्रकरणी शेवटची संधी म्हणून वरील नमूद गावनिहाय फेरचौकशी दिवशी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचारी हे प्रत्यक्ष जागेवर फेरचौकशी करण्याकरिता येणार आहेत. या दिवशी सर्व हितसंबंधित अधिकार अभिलेख (7/12) धारक यांनी पुराव्याच्या सबळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहावे अन्यथा प्रचलित नियमावलीनुसार कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे भिवंडी उप अधीक्षक भूमी अभिलेख सचिन हमजादे यांनी कळविले आहे.