CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

Aakashwani Mumbai Kendra - Seema Vakhare Interview - समाजसेविका सौ. सीमा राजेंद्र वखरे यांची आकाशवाणी मुंबई केंद्रावर विशेष मुलाखत

CRIME BORDER | 04 February 2026 | 05:29 PM

Aakashwani Seema Vakhare
Aakashwani Seema Vakhare
Aakashwani Mumbai Kendra - Seema Vakhare Interview - डोंबिवली : डोंबिवली येथील समाजसेविका सौ. सीमा राजेंद्र वखरे यांची आकाशवाणी मुंबई केंद्रावर “कामगार सभा” या विशेष कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली आहे. वीटभट्टी कामगार तसेच असंघटित कामगारांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या सौ. सीमा वखरे यांच्याशी ही मुलाखत प्रसिद्ध निवेदिका सौ. हर्षदा प्रभू यांनी घेतली आहे.

ही मुलाखत आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता तसेच शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.४० वाजता
आकाशवाणी मुंबईच्या ५५८ KHz – अस्मिता वाहिनीवर तसेच NewsOnAir या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.


सौ. सीमा राजेंद्र वखरे या गेल्या २४ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आणि १७ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी विविध वृत्तपत्रांमधून गुन्हे विषयक लेखन केले आहे. सध्या त्या ‘क्राईम बॉर्डर’ आणि ‘श्री स्वामी सखा’ मासिकाच्या संपादिका असून आश्रय महिला संस्थेच्या अध्यक्षा आहेत. तसेच त्या क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन आणि पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत.


वीटभट्टी व असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर, त्यांच्या हक्कांवर आणि सामाजिक कार्याच्या अनुभवांवर आधारित ही मुलाखत श्रोत्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार असून, सर्व श्रोत्यांनी ही मुलाखत आवर्जून ऐकावी, असे आवाहन सौ. सीमा राजेंद्र वखरे यांनी केले आहे.

समाजसेविका सौ. सीमा राजेंद्र वखरे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी विविध ठिकाणी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने त्या सातत्याने प्रशिक्षण, मार्गदर्शन व जनजागृतीचे कार्य विविध माध्यमांतून करीत असतात.

याच अनुषंगाने दिवा येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी ३० महिलांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक नवा मार्ग खुला झाला आहे.

महिलांच्या प्रगतीसाठी शिक्षण, कौशल्यविकास आणि आत्मनिर्भरतेवर भर देत सौ. सीमा वखरे यांचे सामाजिक कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.  सदर कार्यक्रम मुंबई आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी संघमित्रा भंडारे यांनी कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.

ज्येष्ठ पत्रकार समाजसेवक राजेंद्र वखरे यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत.