CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सेवानिवृत्त/मयत सफाई कामगारांच्या वारसांना महापौर हर्षाली चौधरी, उप महापौर राहुल दामले व आयुक्त अभिनव गोयल यांचे हस्ते

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्ती आदेशांचे वाटप

CRIME BORDER | 15 February 2026 | 01:21 PM

सेवानिवृत्त/मयत सफाई कामगारांच्या वारसांना महापौर हर्षाली चौधरी, उप महापौर राहुल दामले व आयुक्त अभिनव गोयल यांचे हस्ते

डोंबिवली( शंकर जाधव ) :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त तसेच मयत सफाई कामगारांच्या 51 वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्ती पत्र (आदेश) वाटप आज महापौर हर्षाली चौधरी, उप महापौर राहुल दामले व आयुक्त अभिनव गोयल यांचे हस्ते महापौर दालनात करण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे, महापालिका सचिव किशोर शेळके, सामान्य प्रशासन विभागाच्या सहा.आयुक्त सुषमा मांडगे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे तसेच पालिका सदस्य वरुण पाटील, गणेश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देताना महापौर हर्षाली चौधरी यांनी उपस्थित लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि अधिक कार्यक्षमतेने आपले काम करणेबाबत सुचना दिल्या.

नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने काम करून महानगरपालिकेची सेवा अधिक चांगल्या रितीने करावी, असे मार्गदर्शन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना केले.महापालिकेने गेल्या वर्षभरात एकुण 232 वारसांना नियुक्ती पत्रे दिली असून, आतापर्यंत वारसाहक्कासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी दोन वेळा मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे यांनी दिली.