CRIME BORDER | 21 February 2026 | 10:22 AM
नवी मुंबई : 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी खारघर येथे संपन्न होणा-या हिंद-दी-चादर कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेत ठिकठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत आहेत.
त्यानुसार आज घणसोली विभागामध्ये राजीव गांधी खदान तलाव गोठीवली परिसरात, तुर्भे विभागातील गणपतीपाडा परिसरात, सानपाडा सेक्टर 9 गुरुद्वारा परिसरामध्ये, ऐरोली गणपती कॉलनी व ऐरोली नाका परिसरात, वाशी सेक्टर 10 येथील गुरुद्वारा परिसरात, बेलापूर विभागात सायन बेलापूर हायवे अशा 6 ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. यामध्ये स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी व नागरिकांसह 327 जण सहभागी होते.
त्याचप्रमाणे नमुंमपा शाळा क्र 42 घणसोली व गोडसन इंग्लिश स्कुल येथे स्वच्छतेच्या सात सवयींविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.