CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कामोठे मधील इंडो स्कॉट स्कूलचे मैदान दुमदुमले देशभक्तीपर घोषणांनी श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त "भारताच्या नकाशाची देशाची मानवी प्रतिकृती साकार"

CRIME BORDER | 25 February 2026 | 01:35 PM

कामोठे मधील इंडो स्कॉट स्कूलचे मैदान दुमदुमले देशभक्तीपर घोषणांनी  श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त  "भारताच्या नकाशाची देशाची मानवी प्रतिकृती साकार"

नवी मुंबई  :- हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी  आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्ताने आज पनवेल तालुक्यातील कामोठे येथील विश्वस्त इंडो स्कॉट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुप्रसिद्ध गायक सरताज सिंग यांनी गायलेले 'हिंद-दी-चादर' हे गीत गायन सामूहिकरित्या केले. याचबरोबर विविध राज्यांच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संचलन हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.

यावेळी धर्मजागरण मंचचे कोकण प्रांत प्रमुख  महेंद्र रायचुरा जी,   “हिंद दी चादर”  शहिदी समागम राज्य समितीचे मुख्य समन्वयक  श्री. रामेश्वर नाईक, समन्वयक जगदीश सकवान, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रशासन सहआयुक्त विजय म्हसाळ, पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, पनवेल उपविभागीय अधिकारी पवन चांडक, रायगड उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा “हिंद दी चादर” चे समन्वयक रविंद्र राठोड, प्र. उपसंचालक (माहिती) मनोज सानप, तहसिलदार मीनल भामरे, इंडो स्कॉट स्कूलचे विश्वस्त अजय श्रीवास्तव, गट शिक्षणाधिकारी शाहू सतपाल, गट शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, पनवेल महानगरपालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, सुनिता चांदोरकर, विस्तार अधिकारी पनवेल सिताराम मोहिते, अधीक्षक कल्पना काकडे, लखविंदर सिंग, इंडो स्कॉट स्कूलच्या प्राचार्या मेमूल जितेष, आदी मान्यवर उपस्थित होते.  

रायगड जिल्हा परिषद  कोपरा, शाळेच्या विद्यार्थ्यांनी  गायलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या निमित्ताने रुपेश मढवी व संतोष खरे या विद्यार्थ्यांनी श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या  जीवनावर आधारित गीत सादर केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे िविविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवित उत्तम असे सादरीकरण केले. यात लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पंजाबी वेशभूषा सादर केली. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या वारकरी सांप्रदायाची वेशभूषा सादर केली. तर चांगू काना ठाकूर िइंग्रजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या दाक्षिणात्य  वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याबरोबरच सेंट जोसेफ शाळेच्या स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी, लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी व एमएनआर शाळेच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन करीत पाहुण्यांना अभिवादन केले.

प्रास्ताविक करताना “हिंद दी चादर”  शहिदी समागम राज्य समितीचे मुख्य समन्वयक  रामेश्वर नाईक यांनी इतिहासातील दाखले देत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाची कथन केली. त्याचबरोबर राष्ट्रकार्यामध्ये आपण प्रत्येकाने आपआपल्या परीने योगदान देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच  “हिंद दी चादर”  शहिदी समागम कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली.  

धर्मजागरण मंचचे कोकण प्रांत प्रमुख  महेंद्र रायचुरा जी यांनी राष्ट्रीय व सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून राष्ट्रकार्य घडण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींबाबत मार्गदर्शन केले.

लखविंदर सिंग यांनी याप्रसंगी श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्याविषयी यांच्या जीवनगाथेवरील माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबाजी गिते यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी केले.