CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजातींसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना

CRIME BORDER | 25 February 2026 | 01:50 PM

अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजातींसाठी  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना

ठाणे  :-  महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती मांग, मातंग, मिनीमादीग, मादीग, दानखणी मांग, मांगमहाशी, मदारी, राधेमाग, यांग गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील 18 ते 50 या वयोगटातील दारिद्रय रेषेखालील ज्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.3,00,000/- (अक्षरी तीन लाख मात्र) पर्यंत आहे, अशा बेरोजगारांकरीता साहित्यरत्म लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात.

शासन निर्णय क्र. एलएस 2022/ प्र. क्र.94/ महामंडले, दि.4 नोव्हेंबर 2022 अन्वये महामंडळाचे पुढील योजनाचे उदिष्ट मुख्य कायालयाचे दि.17/09/2025 अन्यये जिल्हा कार्यालय ठाणे येथे प्राप्त झाले असून ने उद्दिष्ट पुढील प्रमाण, अनुदान योजना 75, विजभांडवल योजना 60 व थेट कर्ज योजना-60 पा भेट फर्म योजने अंतर्गत जिल्हा कार्यालय ठाणे 50 चं भौतिक उद्दिष्ट (50% पुरुष व 50% महिला) देण्यात आलेले आहे. यामध्ये ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील तमच राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना तसेच सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसांपैकी एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यान येईल.

तथापी उपरोक्त नमूद दिलेल्या उहिष्टापैकी ठाणे जिल्हा कार्यालयात उद्दिष्टांच्या प्रमाणात 50% कर्ज प्रकरणे प्राप्त झाल्याने पुन्हा कर्ज प्रकरणाची मागणी करण्यात येत असून त्या अनुषंगाने थेट कर्ज योजना (प्रकल्प मर्यादा रु.1,00,000/-) व (बिज भांडवल योजना प्रकल्प मर्यादा रु.50,000/- ते रु.7,00,000/-पर्यंत) कर्जाचे अर्ज जिल्हा कार्यालयात दि.20/02/2026 पासून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर कर्ज अर्जाकरिता ठाणे जिल्ह्यातील खालील नमूद केलेल्या पात्रता व अटी/शर्ती व निकषांची पूर्तता करणारा अर्जदार पात्र राहील. अशा इच्च्छुक अर्जदारांनी/लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह कर्ज अर्जाचा फॉर्म सुव्यवस्थित 3 प्रतीत भरुन महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा माळा, दत्तवाडी, श्री स्वामी समर्थ मठासमेार, सह्याद्री शाळेच्या बाजुला खारेगांव, कळवा (प.) जिल्हा ठाणे येथील कार्यालयात सकाळी 10.00ते 5.00 या कार्यालयीन वेळेत (सार्वजनिक सुट्टी वगळून) सादर करावा, अर्ज सादर करण्याचा अंतिम दि.13 मार्च, 2026 पर्यंत राहील.

 कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रांचा तपशिल पुढीलप्रमाणे

1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

2. मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीपैकी असावा.

3.अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे.

4. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

5. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.3,00,000/- (अक्षरी तीन लाख मात्र) यापेक्षा जास्त नसावे.

6. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभघेता येईल.

8. व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे कोटेशन, ज्ञान व अनुभव / प्रशिक्षित असावा.

9. महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे /प्रमाणपत्रे /करारपत्रे/

     कर्जमागणी  अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

10. आधारकार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, व्यवसायचे प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र इ.

11. बिजभांडवल व थेट कर्ज प्रकरण मंजूरी नंतर दोन जामीनदार (एक जामीनदार शासकीय / निमशासकीय नोकरदार

      व दुसरा जामीनदार मालमत्ताधारक असावा.)

12. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय दि.22/08/2025 अन्वये महामंडळामार्फत राबविण्यात

     येणाऱ्या रु.2,00,000/- पर्यंतच्या कर्जाच्या योजनेसाठी लाभार्थ्यांच्या स्वतः च्या अथवा एक जामीनदारांच्या स्थावर

     मालमत्ता/जमीन जुमला/मिळकत यावर बोजा चढविणे.

13. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय दि.22/08/2025 अन्वये महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या रु.2,00,000/- ते 5,00,000/- पर्यंतच्या कर्जाच्या योजनेसाठी एक जामीनदार खाजगी क्षेत्रातील नोकरदार (संबंधित कार्यालयाचे पगारपत्रक व हमीपत्र) अथवा शासकीय अनुदानित संस्था/निमशासकीय/शासकीय नोकरदार (नोकरदाराचे पगारपत्रक व प्रतिज्ञापत्र) अथवा जामीनदाराच्या स्थावर मालमत्ता/जमीन जुमला/मिळकत यावर बोजा चढविणे व लाभार्थ्यांच्या स्वतः च्या मालमत्तेवर बोजा चढविणे.

कर्जप्रस्ताव सादर केल्यानंतर महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार मंजूरी संदर्भातील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) ठाणे जिल्हा व्यवस्थापक,

बाबासाहेब तडाखे यांनी कळविले आहे.